Pune BJP leads in campaign : पुण्यात भाजपचा प्रचाराचा धडाका!, महापालिका निवडणुकीसाठी जबरदस्त नियोजन

BJP leads in Pune Campaign : भाजपच्या स्थानिक नेत्यांनी कसली कंबर; तर इतर पक्ष अद्यापही बैठका अन् चर्चांमध्येच व्यस्त
BJP aggressive campaign drive in Pune as part of strategic preparations for the upcoming municipal elections.

BJP aggressive campaign drive in Pune as part of strategic preparations for the upcoming municipal elections.

esakal

Updated on

BJP in PMC Election News : नगरपरिषद, नगरपंचायत निवडणुकीत राज्यभरात सर्वाधिक जागा जिंकून अव्वल ठरलेल्या भाजपने आता आगामी महापालिका निवडणुकीसाठीही चांगलीच कंबर कसली आहे. त्यानुसार पुणे शहरात तर भाजपने प्रचाराचा धडाका सुरू करत आघाडीही घेतली आहे.

पुणे शहरात जागोजागी भाजपने आपल्या सरकारने केलेल्या विकासकामांचे मोठे फलक लावले आहेत, जे पुणेकरांचे लक्ष देखील वेधून घेत आहे. एकीकडे भाजपने प्रचारास जोरदार सुरूवात केली आहे. तर तर दुसरीकडे अन्य पक्ष अद्यापही चर्चेच्या फेऱ्यातच अडकले आहेत. विरोधी पक्षांचं अद्यापही जागांबाबत एकमत होत नसल्याचं दिसत आहे.

तर भाजपने प्रचार आघाडी घेतल्याने शहरात चांगलीच वातावरण निर्मीती झाली आहे. याचा फायदा भाजपच्या उमेदवारांना नक्कीच मिळेल, असे दिसत आहे. शिवाय, भाजपचे स्थानिक नेतेही जास्तीत जास्त नगरसेवक निवडून आणण्यासाठी नियोजन करून कामाला लागल्याचे दिसत आहे.

भाजपने पुणेकरांचा जिव्हाळ्याचा विषय असणाऱ्या मेट्रोच्या कामाची माहिती देणारे फलकही शहरात लावले आहेत. ज्यावर, आजपर्यंत १० कोटींहून अधिक प्रवाशांनी घेतला मेट्रोचा लाभ, पुण्यात मेट्रो सारखे प्रकल्प राबवायचे तर भाजपच पाहिजे, ३३ किलोमीटरपर्यंत मेट्रो मार्ग सेवेत, २३ किलोमीटर हिंजवडी-शिवाजनगर मेट्रो लवकरच सेवेत, ५६ किलोमीटरच्या नव्या रेल्वे मार्गांना मंजुरी, ४६ किलोमीटरचा मेट्रो मार्ग प्रस्तावित अशी महत्त्वपूर्ण माहिती दिली आहे.

याशिवाय नदी पुनरज्जीवनाचाही मुद्दा भाजपने मोठ्या फलकांद्वारे पुणेकरांसमोर मांडला आहे. ज्यामध्ये भाजपने म्हटले आहे की, नदीचे फक्त सुशोभिकरण नव्हे पुनरज्जीवन, पुण्यातील नद्यांना नवसंजीवनी द्यायची तर भाजपाच पाहिजे. तसेच २७० नवे प्रवेशमार्ग, १३० मीटरपर्यंत नदी पात्रांची रुंदी वाढवणार आणि ५० नव्या गणेश विसर्जन घाटांची निर्मिती अशी माहिती दिली गेली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com