

Dilip Barate and Abhijit Shivarkar join BJP in Pune in the presence of Union Minister Muralidhar Mohol
पुणे : भाजप मध्ये आज तिसऱ्या टप्प्यातील प्रवेश पार पडले असून, राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी उपमहापौर दिलीप बराटे, काँग्रेसचे माजी मंत्री बाळासाहेब शिवरकर यांचे पुत्र माजी नगरसेवक अभिजित शिवरकर यांनी प्रवेश केला. केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या उपस्थितीमध्ये हे प्रवेश झाले. आमदार सुनील कांबळे, निवडणूक प्रमुख गणेश बिडकर, शहराध्यक्ष धीरज घाटे, राज्यमंत्री दिलीप कांबळे आदी उपस्थित होते.