
पुणे महानगरपालिकेत एका धक्कादायक घटनेने खळबळ उडाली आहे. भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) कामगार आघाडीचा पदाधिकारी ओंकार कदम याला महापालिकेत प्रवेशबंदी करण्यात आली आहे. एका महिला अधिकाऱ्याला धमकावल्याच्या आरोपांनंतर ही कारवाई करण्यात आली.
विशेष म्हणजे, थेट मुख्यमंत्री कार्यालयाने या प्रकरणाची दखल घेतल्यानंतर नवे आयुक्त नवलकिशोर राम यांनी तातडीने कारवाई केली. जे काम मागील आयुक्तांना जमले नाही, ते नव्या आयुक्तांनी करून दाखवले.