
Pune : पेट्रोल, डिझेलवरील व्हॅट कमी करण्यासाठी भाजपचे आंदोलन
पुणे : पेट्रोल, डिझेलवरील व्हॅट कपात करावा, एसटी कामगारांच्या मागण्यात मान्य कराव्यात आणि आरोग्य विभागातील भरतीतील अनागोंदीविरोधात भाजपतर्फे आज महात्मा फुले मंडई येथे आंदोलन करण्यात आले. लोकांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करणाऱ्या महाविकास आघाडी सरकारचा निषेध करण्यासाठी डोळ्याला पट्टी बांधलेल्या प्रतिकात्मक राक्षसाचा देखावा सादर केला. यावेळी सरकारविरोधी घोषणाबाजी करण्यात आली.
हेही वाचा: स्वतःवरील आरोप दाबण्यासाठी फडणवीसांनी मलिकांचं प्रकरण काढलं - आंबेडकर
भाजपचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. केंद्र सरकारने पेट्रोल, डिझेलच्या उत्पादन शुल्कात केली तरी महाविकास आघाडी सरकारने अद्याप व्हॅट कमी केलेला नाही. त्यामुळे नागरिकांना भुर्दंड पडत आहे. केंद्राच्या निर्णयानंतर देशात अकरा राज्यांनी व्हॅट कपात केला, पण शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेसच्या सरकारला अद्याप निर्णय घेता आला नाही.
महाविकास आघाडीला सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांमध्ये स्वारस्य नाही, अशी टीका भाजपचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांनी केली. सरचिटणीस गणेश घोष, राजेश येनपुरे, दत्ता खाडे, संदीप लोणकर, उपाध्यक्षा स्वरदा बापट, महिला अध्यक्ष अर्चना पाटील, प्रमोद कोंढरे, रवींद्र साळेगावकर, धनंजय जाधव, पुनीत जोशी आदी पदाधिकारी, कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.
हेही वाचा: 'राफेल'बाबत लढण्यासाठी राहुल गांधींनी दिला नवा मंत्र, म्हणाले, "मेरे कांग्रेस साथियों..."
मुळीक म्हणाले, आपले अपयश लपविण्यासाठी महाविकास आघाडी सरकार सातत्याने केंद्राकडे बोट दाखवत आहे. केंद्र सरकारने इंधनाचे भाव कमी केल्यानंतर राज्यातील आघाडीचा खरा चेहरा नागरिकांपुढे उघडा पडला आहे. इंधनावरील व्हॅट कमी केल्यास सर्वच वस्तूंच्या किमती कमी होणार आहे. त्यामुळे राज्यातील नागरिकांना मोठा दिलासा मिळू शकेल. परंतु हप्ता वसुली, बदल्यांमधील भ्रष्टाचार, गुन्हेगारी प्रवृत्तींना पाठीशी घालणे, जनतेमध्ये दहशत निर्माण करणे हे राज्य सरकारचे प्राधान्यक्रम आहेत.
Web Title: Pune Bjp Protest Against Maharashtra Government Decreased Petrol Diesel
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..