
Pune Latest News: पुणे महापालिकेची निवडणूक भाजपने स्वतंत्र लढवावी, अशी भूमिका शहरातील भाजप कार्यकर्त्यांची आहे. असं असताना केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी मात्र वरिष्ठांच्या कोर्टामध्ये चेंडू ढकलला. पक्षाचे वरिष्ठ नेते जो निर्णय घेतील त्यानुसार निवडणुका होतील. त्यामध्ये निवडून येण्याचा निकष महत्त्वाचा असणार आहे, असे मोहोळ यांनी स्पष्ट केले.