
पुण्यातील कोथरूडमध्ये भाजप कार्यकर्त्याला झालेल्या मारहाणीच्या घटनेने शहरात खळबळ उडवली आहे. या घटनेवर केंद्रीय हवाई वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी पुणे पोलिसांवर जोरदार टीका केली असून, "पोलिस आयुक्तांनी आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे," असा संताप व्यक्त केला आहे. तसेच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत चर्चा झाली असून पोलिसांनी कडक भूमिका घ्यावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.