
Pune News
sakal
पुणे : शहरात मोठ्या प्रमाणात अनधिकृत नळजोड घेणाऱ्यांविरुद्ध महापालिकेने आता कडक कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून व्यावसायिक व घरगुती वापरासाठी घेतलेल्या अनधिकृत नळजोड तोडण्याची कारवाई सुरू करण्यात आली आहे, तर दुसरीकडे बेकायदा नळजोड घेणाऱ्यांना विभागाकडून नोटीस बजावण्याच्या प्रक्रियेला गती देण्यात आली आहे.