

Pune Bomb Scare: Accused Learned Bomb-Making on YouTube
esakal
पुणे - हडपसर येथील एका हॉस्पिटलमध्ये बॉम्बसदृश वस्तू सापडल्याने निर्माण झालेल्या गोंधळातून पुणे पोलिसांनी महत्त्वाचा खुलासा केला आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपीला नागपुरातून अटक करण्यात आली असून, त्याने यूट्यूबवरील व्हिडिओ पाहून हा बॉम्ब बनवल्याचे समोर आले आहे. पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी याबाबत सविस्तर माहिती दिली.