
पुणे : हद्दीतील नव्वदपैकी विविध प्रकारच्या चाळीस पुलांच्या बांधकामाचे स्ट्रक्चर ऑडिट पुणे महापालिकेकडून पूर्ण करण्यात आले आहे. त्यापैकी ३८ पुलांची दुरुस्तीची आवश्यकता असून ते काम सुरू करण्यात आले आहे. आतापर्यंत सत्तर टक्के काम पूर्ण झाले आहे, तर शहरातील होर्डिंगचेदेखील स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात आले असून, आकाशचिन्ह विभागाकडे अधिकृत मान्यता असलेल्या २ हजार ६४० होर्डिंग तपासणीत सुस्थितीत आढळली आहेत.