
पुणे : बांधकाम व्यावसायिकांसाठी आता गौण खनिज वाहतुकीचा परवाना ऑनलाइन मिळणार आहे. महापालिकेने दिलेल्या बांधकाम परवान्यांची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयाच्या ‘महाखनिज’ पोर्टलशी जोडण्यात येणार आहे. त्यामुळे उत्खननातून निघणाऱ्या खनिजाच्या वाहतुकीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पुन्हा अर्ज करण्याची गरज राहणार नाही. या प्रणालीमुळे वेळेची बचत होऊन गौरव्यवहारांना लगाम लागणार आहे.