

Pune News
esakal
पुणे: बांधकाम पूर्ण झाल्यानंतर गृहप्रकल्पांना पाणी पुरवठा करण्याचे प्रतिज्ञापत्र सादर करूनही बांधकाम व्यावसायिक त्याचे पालन करत नसल्याचे सांगत अशा बांधकाम व्यावसायिकांवर कारवाई करण्याची आक्रमक भूमिका नगरसेवकांनी घेतली. याबाबत ठोस धोरण करून त्याची कार्यवाही करण्याची भूमिका प्रशासनाने घेतली.