

Pune Crime News
sakal
पुणे : "आमच्या घरी झालेली फक्त चोरी नव्हती, तर संगनमताने टाकलेला दरोडा होता. दुसऱ्या देशातील चोरट्य़ांनी पुण्यात येऊन केलेली चोरी, हा गंभीर प्रकार आहे. चोरट्य़ांकडून जीवे मारण्याचा प्रयत्न करून, पोलिसांना सर्व पुरावे तत्काळ देऊनही पोलिसांनी जाणीवपूर्वक या प्रकरणाच्या तपासाकडे दुर्लक्ष केले, असा गंभीर आरोप निवृत्त प्रशासकीय अधिकारी दिलीप खेडकर यांनी पुणे पोलिसांवर केले.