
पुणे : शहरात हडपसर, धायरी, कोरेगाव पार्क आणि मार्केट यार्ड अशा विविध भागात शनिवारी रात्री पाच घरफोडीच्या घटनांमध्ये चोरट्यांनी ४५ लाखांहून अधिक किमतीचा ऐवज लांबवला. यामध्ये हडपसरमधील एका सदनिकेतून ३८ लाख ८८ हजार रुपयांचे सोन्याचे, हिरेजडीत दागिने व रोकड चोरी करण्यात आली.