
पुण्यातील येरवडा परिसरात सकाळी आठच्या सुमारास एक दुर्दैवी घटना घडली. खराडीकडून येणारी एक बस नो एंट्री झोनमध्ये घुसली आणि रस्त्यावरून जाणाऱ्या डिलिव्हरी बॉय तरुणाला धडक दिली. या अपघातामुळे तरुण गंभीर जखमी झाला असून, त्याला तत्काळ वैद्यकीय मदतीची गरज होती.