Pune Bypoll Election: पुणे पोटनिवडणुकीत नवा ट्विस्ट; चंद्रशेखर बावनकुळेंच मोठ वक्तव्य

कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा उद्या शेवटचा दिवस आहे. दरम्यान, बावनकुळे यांनी मोठं वक्तव्य केलं
Chandrashekhar Bawankule
Chandrashekhar BawankuleEsakal

सध्या राज्याच्या राजकारणात पुण्यातील पोटनिवडणुकांची रणधुमाळी पाहायला मिळत आहे. कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुका लवकर पार पडणार आहेत. उमेदवारी अर्ज भरण्याचा उद्या शेवटचा दिवस आहे. दरम्यान, भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. वेळ आहे उमेदवार बदलता येईल, असं खळबळजनक विधान बावनकुळे यांनी केलं आहे. (pune bypoll election kaaba and chinchwad Chandrashekhar Bawankule mahavikas aghadi )

निवडणूक बिनविरोध करण्याच्या आवाहनानंतर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी म्हंटलं होतं की, जर मुक्ता टिळक यांच्या घरी ही उमेदवारी दिली असती तर बिनविरोध करण्याचा विचार केला असता. त्यांच्या या वक्तव्यानंतर बावनकुळे यांनी सूचक वक्तव्य केलं आहे.

काय म्हणाले बावनकुळे?

महाविकास आघाडीचा उमेदवार नसेल तर आम्ही टिळकांना उमेदवारी देऊ . दादांच्या म्हणण्याप्रमाणे आमचे नेतृत्व विचार करेल. दादांची भूमिका जी आहे ती पक्षाला मान्य आहे. महाविकासआघाडीने आजचं कळवलं तर उद्याचा दिवस बाकी आहे. निश्चित पणे तसा निर्णय घेता येईल.

Kasaba Bypoll: टिळकांना उमेदवारी देतो, दोन्ही निवडणूका बिनविरोध करा? चंद्रकांत पाटलांची गुगली

मुक्ताताई असत्या तर प्रश्नच नव्हता, कोणी कोणाला डावलत नाहीये ब्राह्मणांनी तर पक्षासाठी आयुष्य दिलंय. पक्षाने ब्राह्मण समाजाला न्याय दिलाय आणि समाजानेही खूप काही दिलंय. आजही त्यांनी चिंचवड आणि कसब्याला पाठिंबा दिला तर आम्ही तसा विचार करु बापट यांची प्रकृतीदेखील चांगली नाही. त्यामुळे भाजप कुणावर अन्याय करत नाही. महाविकासआघाडीने एक पाऊल मागे घेतले तर दोन्ही मतदारसंघाच्या निवडणुका बिनविरोध करायला तयार आहे.

शरद पवार, उद्धव ठाकरे आणि नाना पटोले यांना आजही विनंती करतोय की ही निवडणुक बिनविरोध व्हावी. असही बावनकुळे यावेळी म्हणाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com