कसबा पोटनिवडणूक "ती" च्या हातात; मतदार यादी जाहीर pune bypoll election | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Pune bypoll election

Pune bypoll election: कसबा पोटनिवडणूक "ती" च्या हातात; मतदार यादी जाहीर

पुणे जिल्ह्यातील कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीसाठी मतदार यादी जाहीर झाली आहे. पुणे जिल्ह्यातील दोन्ही विधानसभा पोटनिवडणुकीसाठी प्रशासन सज्ज झालं आहे.

कसबा पेठ विधानसभा मतदारसंघामध्ये एकूण मतदारांची संख्या २,७५,६७९ असून त्यापैकी १,३६,९८४ पुरुष तर १,३८,६९० महिला आणि ५ तृतीयपंथी मतदार आहेत. तर चिंचवड विधानसभा मतदारसंघांमध्ये एकूण मतदारांची संख्या ५,६८,९५४ असून त्यापैकी ३,०२,९४६ पुरुष तर २,६५,९७४ महिला आणि ३४ तृतीयपंथी मतदार आहेत.

चिंचवड मध्ये ५१० तर कसबा पेठेत २७० मतदान केंद्र असणार आहेत. निवडणूक प्रक्रियेवर लक्ष ठेवण्यासाठी निवडणूक आयोगा मार्फत २ सर्वसाधारण निरीक्षक, २ पोलिस निरीक्षक, २ खर्च निरीक्षकांची नेमणूक करण्यात आली आहे. दोन्ही मतदारसंघात सुरक्षितता म्हणून सी आय एस एफ,.सी आर पी एफ, आय टी बी एफ च्या तुकड्या तैनात असणार आहेत.

मुक्ता टिळक आणि लक्ष्मण जगताप यांच्या निधानामुळे अनुक्रमे कसबा आणि चिंचवड येथील विधानसभेच्या जागा रिक्त झाल्या आहे. त्यामुळे या मतदासंघाची पोटनिवडणूक जाहीर केली आहे. त्यासाठी महाविकास आघाडी आणि भाजपाने आपले उमेदवारी जाहीर केले असून, २६ फेब्रुवारीला या दोन्ही जागेसाठी मतदान पार पडणार आहे.