Pune : येरवड्यात कारला लागून कार जळून खाक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

pune

Pune : येरवड्यात कारला लागून कार जळून खाक

पुणे : येरवडा येथील गोल्फ क्लब रस्त्यावरील औद्योगिक शाळेसमोर एका चारचाकी वाहनाने अचानक पेट घेतला होता. येरवडा अग्निशामक दलाच्या जवानांनी घटनास्थळी तत्काळ पोचून आग विझविली. हि घटना शुक्रवारी रात्री साडे नऊ वाजता घडली. सुदैवाने या घटनेत कोणीही जखमी झाले नाही.

शुक्रवारी रात्री साडे नऊ वाजता एक कार येरवड्याच्या दिशेने जात होती. त्यावेळी कारमधून धूर येऊ लागल्याने चालकाने कार रस्त्याच्या बाजूला थांबविली. त्यानंतर कारला आग लागली. याबाबत अग्निशामक दलाच्या केंद्राला खबर देण्यात आली. त्यानंतर येरवडा अग्निशामक दलाच्या जवानांनी घटनास्थळी तत्काळ पोचून होजरीलच्या साह्याने पाण्याचा मारा करत आग पुर्ण विझवली. वाहनामधे पाच व्यक्ति प्रवास करीत होते.

वाहनातून धूर येत असल्याचे लक्षात येताच हे सर्वजण सुखरुप बाहेर आले. आगीचे नेमके कारण समजू शकले नाही. या कामगिरीत येरवडा अग्निशमन केंद्र अधिकारी सुभाष जाधव, वाहनचालक सुनिल धुमाळ, फायरमन उत्तम खांडेभराड, सुनिल खराबी व मदतनीस अक्षय तरटे, अक्षय पवार यांनी सहभाग घेतला.