पुणे : सागाचे झाड तोडताना तिघांना रंगेहात पकडले | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Three person arrested while cutting sag tree

पुणे : सागाचे झाड तोडताना तिघांना रंगेहात पकडले

किरकटवाडी : खानापूर (ता.हवेली) वन परिमंडळ हद्दीत असलेल्या मणेरवाडी येथे बेकायदेशीरपणे सागाच्या झाडाची चोरी करत असताना वन विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले आहे. अक्षय राजू जाधव (वय 23), रमेश सुरेश जाधव (वय 29) व सनी राजू जाधव (वय 20) अशी गस्ती पथकाने पकडलेल्या आरोपींची नावे आहेत. तिघांवरही वन कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास खानापूर वन परिमंडळ अधिकारी बाबासाहेब लटके, सुरक्षा रक्षक उत्तम खामकर, निलेश सांगळे व रमेश खामकर हे मणेरवाडी गावच्या हद्दीत गस्त घालत असताना तिघेजण सागाचे मोठे झाड तोडताना दिसले. गस्ती पथकाने तिघांनाही ताब्यात घेतले. त्यांच्याकडील कुऱ्हाडी व एक तीनचाकी मालवाहू टेम्पो वन विभागाने जप्त केला आहे. भांबुर्डा वनपरिक्षेत्र अधिकारी प्रदीप संकपाळ यांच्या मार्गदर्शनाखाली खानापूर वन परिमंडळ अधिकारी बाबासाहेब लटके यांनी तिघांवरही भारतीय वन अधिनियम 1927 चे कलम 26(ड) नुसार गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत बोलताना वन परिमंडळ अधिकारी बाबासाहेब लटके म्हणाले की, आम्ही वन संवर्धनाबाबत नागरिकांना वारंवार आवाहन करत आहोत. वन व प्राणी संंपत्तीच्या रक्षणासाठी वन विभागाकडून प्रयत्न सुरू आहेत. अशाप्रकारे बेकायदेशीरपणे कोणीही वृक्षतोड करु नये. अशा घटना निदर्शनास आल्यास संबंधितांवर कडक कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.

Web Title: Pune Case Filed Three Person Arrested While Cutting Sag Tree Khanapur Forest Circle Officer

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top