पुण्यातील भाजप नगरसेविकेवर गुन्हा दाखल; हळदी-कुंकू कार्यक्रम आला अंगाशी

BJP_Pune
BJP_Pune

पुणे : शहरामध्ये कोरोनाचा संसर्ग वाढत असतानाच पोलिसांची पुर्वपरवानगी न घेताच एका नगरसेविकेने 1800 ते 2000 महिलांच्या हळदी-कुंकवाचा कार्यक्रम घेतल्याचा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी गर्दी जमवून कोरोनासंबंधीच्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी नगरसेविकेसह तिघांविरुद्ध खडक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार महात्मा फुले वाडा रस्ता परिसरात घडला आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला होता.

याप्रकरणी नगरसेविका विजयालक्ष्मी मोतीलाल हरिहर, माजी नगरसेवक विष्णू आप्पा हरिहर आणि निर्मल मोतीलाल हरिहर (सर्व. रा. गुरूवार पेठ ) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी पोलीस शिपाई दिनेश खरात यांनी खडक पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांच्याविरुद्ध भारतीय दंड सहिंता 188/269 नुसार जीवीतास धोका असलेल्या रोगाचा संसर्ग पसरविण्याचा संभव असलेली हयगयीची कृती केल्याप्रकरणी, महाराष्ट्र कोविड 19 उपाययोजना 2020 चे कलम 11 नुसार आणि आपत्ती व्यव्यस्थापन कायदा 51 बी यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोरोनाच्या वाढत्या प्रादुभार्वामुळे सार्वजनिक कार्यक्रम घेताना शासकीय नियमावलीचे पालन करणे आवश्‍यक आहे. मात्र, भारतीय जनता पक्षाच्या नगरसेविका विजयालक्ष्मी हरिहर, त्यांचे दिर यांनी सोमवारी हळदी-कुंकवाच्या कार्यक्रमासाठी पोलिसांची परवानगी न घेता महात्मा फुले वाडा परिसरातील रस्त्यावर 1800 ते 2000 लोकांची गर्दी जमविली. त्याशिवाय सार्वजनिक रस्त्यावर विनापरवाना स्टेज टाकून तिळगूळ वाटप व भेटवस्तूंचे वाटप केले. हरिहर यांनी त्यांच्या प्रभागातील महिलांसाठी आयोजित केलेल्या संबंधीत हळदी-कुंकवाच्या कार्यक्रमास भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी हजेरी लावली होती. त्यानंतर त्यांनी उपस्थित महिलावर्गाला मार्गदर्शन केले.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by: Ashish N. Kadam)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com