Pune Municipal Corporation: आयुक्त संतापले! पुण्यातल्या शासकीय, निमशासकीय कर्मचाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे आदेश

Pune Municipal Commissioner Warns Strict Action Against Employees Ignoring Census Duty: पुणे महापालिका क्षेत्रातील ६० टक्के प्रगणक गटांचे घरोघरी जाऊन माहिती संकलनाचे काम सुरु झाले आहे.
Pune Census News

Pune Census News

esakal

Updated on

Pune Latest News: जनगणनेचे काम १४ जूनपर्यंत पूर्ण करण्याचे आव्हान प्रशासनापुढे असताना काही कर्मचारी या कामाकडे दुर्लक्ष करत आहेत. अशा कर्मचाऱ्यांची गय केली जाणार नाही, राष्ट्रीय कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी त्यांच्यावर थेट फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे आदेश आयुक्त नवल किशोर राम यांनी दिले. शहरातील १५ पैकी ५ क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत ५० टक्क्यांपेक्षा कमी काम झाल्याने मंगळवारी आयुक्तांनी अधिकाऱ्यांना फैलावर घेतले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com