Chandni Chowk Bridge History : २५ लाखात उभारलेला चांदणी चौकातला 'तो' चिवट पूल, स्फोटकांपुढे देखील झुकला नाही !

चांदणी चौकातील पूल पाडण्याची घटना केवळ पुण्यातच नव्हे तर देशभर चर्चेचा विषय ठरली.
Chandni Chowk Bridge History  satish marathe
Chandni Chowk Bridge History satish maratheesakal
Summary

गेल्या वर्षी चांदणी चौकातील पूल पाडण्याची घटना केवळ पुण्यातच नव्हे तर देशभर चर्चेचा विषय ठरली होती

पुणे - गेल्या वर्षी चांदणी चौकातील पूल पाडण्याची घटना केवळ पुण्यातच नव्हे तर देशभर चर्चेचा विषय ठरली. सहाशे किलोंची स्फोटके वापरूनही पूल पूर्णपणे पडला नाही. खिळखिळा झाला, काही गर्डर आणि स्टीलचे अवशेष शिल्लक राहिले आणि त्यानंतर इतका मजबूत पूल कोणी बांधला, याची उत्सुकता ताणली गेली. अधिक माहिती घेतली असता तो पूल सतीश मराठे आणि अनंत लिमये यांच्या बार्ली इंजिनिअर्स कंपनीने बांधल्याची माहिती मिळाली होती .

‘चांदणी चौकातील पुलाच्या बांधकामासाठी त्यावेळचे नवीन तंत्रज्ञान वापरले होते. स्टीलचा वापरही आवश्यक तेवढाच केला होता. एखादे काम सचोटीने केले तर ते चांगलेच होते. हा पूल पाडल्यानंतर मनाला वाईट वाटले. परंतु सध्या हा पूल वाहतूक कोंडीला जबाबदार ठरत असेल तर त्याला उपाय नव्हता, विकासाच्या दृष्टीने ते आवश्यकच असते,’' अशी भावना बार्ली कंपनीचे सतीश विष्णू मराठे यांनी बोलून दाखवली.

जुन्या आठवणींना उजाळा देत मराठे म्हणाले, ‘‘चांदणी चौकातील पूल १९९२ साली उभारला होता. हा पूल बांधण्यासाठी सुमारे २५ लाख रुपये खर्च आला होता. तो पाडण्यासाठी दीड कोटींचा खर्च आला. हा पूल बांधण्यासाठी दोन स्टीलचे बार जोडताना त्यावेळी नवीन असलेले ‘कपलर’ तंत्रज्ञान वापरण्यात आले होते. पुणे-मुंबई हा रहदारीचा मार्ग असल्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाकडून आम्हाला कमी वेळेत पूल उभारण्याचे आव्हान होते. ते पाच महिन्यांत पूर्ण केले होते. त्याचवेळी आळंदी येथील एसटी स्टॅंड ते मंदिराकडे जाणाऱ्या पुलाचेही बांधकाम केले.’’

चांदणी चौकातील पूल आम्ही बांधला. परंतु या पुलाच्या उद्घाटनावेळी आम्हाला बोलावण्यात आले नव्हते. परंतु हे असे चालतेच. दुसरा एक पूल उभारताना तो पूल पुणे आणि पिंपरी-चिंचवडच्या हद्दीत येत होता. त्या पुलाचे उद्घाटन दोन्ही बाजूने दोन वेळा करण्यात आल्याची मजेशीर आठवणही त्यांनी सांगितली.

मराठे हे गेल्या ५३ वर्षांपासून बांधकाम क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी आता प्रभात रस्त्यावरील सतीश मराठे कन्सल्टिंग इंजिनिअर्स या नावाने नवीन फर्म सुरू केली आहे. मागील काही वर्षांपासून पुलाचे डिझाइन आणि बांधकाम बंद केले आहे. ते सध्या इमारतीच्या डिझाइन आणि कन्स्ट्रक्शन व्यवसायात कार्यरत आहेत. वयाच्या ७६ व्या वर्षीही ते अजूनही तेवढ्याच उत्साहाने आणि मेहनतीने काम करीत आहेत, हे त्यांचे खास वैशिष्ट्य.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com