Chandni Chowk Bridge Demolition : अखेर पुण्यातील चांदणी चौकातील पूल जमीनदोस्त!

Chandni Chowk Bridge Demolition Live
Chandni Chowk Bridge Demolition Live

अखेर पुण्यातील चांदणी चौकातील पूल पाडण्यात यश

अखेर २ वाजून ३३ मिनीटांनी चांदणी चौकातील पुल पडला. पूल पाडण्यात आम्ही १०० टक्के यशस्वी झालो आहोत अशी माहिती उत्कर्ष मेहता, एडीफिस इंजिनिअरिंग कंपनीचे पार्टनर यांनी दिली आहे. आम्ही ब्लास्ट केला त्याचा आम्हाला फायदा झाला, आम्ही मुद्दाम काही भाग ब्लास्ट होणार नाहीत यासाठी सोडले होते. या पद्धतीला fragmentation असं म्हणतात. जे पद्धत ट्विन टॉवर पाडण्यासाठी वापरण्यात आली होती त्याला impulsive ब्लास्टींग असं म्हणले जाते, असेही त्यांनी सांगितले. तसेच सकाळी ८ च्या आधीच आमचे काम पूर्ण होईल असा विश्वास देखील त्यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केला

ब्लास्ट एक्सपर्ट म्हणाले, 'आम्हाला स्टीलचा अंदाज आला नाही, पण..'

चांदणी चौकातील हा पूल बांधण्यात आला त्यावेळी त्यामध्ये जास्तीच्या प्रमाणावर स्टीलचा वापर केला गेला. आम्हाला त्या स्टीलचा अंदाज आला नाही. त्यामुळे काहीसा भाग अद्यापही राहीला आहे. मात्र आम्ही सांगितलेल्या वेळेनुसार पूल पडला जाईल आणि वाहतुकीसाठी लवकरच खुला होईल : आनंद शर्मा, ब्लास्ट एक्सपर्ट

पुलाचा ५० टक्के भाग पाडण्यात यश

पुलाचा अर्धा भाग पाडण्यात यंत्रणांना यश आले असून पूल फोकलेन मशीनच्या साहायाने पाडण्यात आला आहे. दरम्यान ३ फोकलेनचे युद्ध पातळीवर काम सुरू असून परिसरात मोठा ढिगारा पडाला आहे.

वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी सर्व आवश्यक बाबी केल्या जातील -  मुख्यमंत्री शिंदे  

हा पूल पाडल्यानंतर नवीन पुलाचं काम सुरू होईल, सर्व्हिस रोडसह सर्वांच काम लगेच सुरू होईल. लवकरच त्या भागातील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी सर्व आवश्यक बाबी केल्या जातील, असे मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले. पुढे बोलताना यासाठी किती वेळ लागेल असे विचारले असता, मुख्यमंत्री म्हणाले की, काम लगेच सुरू होऊल, काम मंजूर आहे. या पूलामुळे काम थांबलेलं, या पुलामुळे बॉटल नेक होत होतं म्हणून हा पूल पाडण्यात आला आहे असे ते म्हणाले.

 पूल पाडणं अद्याप सुरूच, वाहतूक उशीरा सुरू होण्याची शक्यता 

सध्या पोकलेनच्या सहायाने पुल पाडण्याचे काम सुरू असल्याने वाहतूक उशिरा सुरू होण्याची शक्यता आहे. स्फोटानंतर ५० टक्के पुल कोसळला दुसरा ब्लास्ट होणार नाही. त्यामुळे रस्ता रिकामा करण्यासाठी अपेक्षेपेक्षा जास्त वेळ लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे. 

चांदणी चौकातील पुल पूर्णपणे पडलाच नाही

चांदणी चौकातील पुल पूर्णपणे पडलेला नाही अवघ्या पाच सेकंदात ब्लास्ट झाला पण पुल पूर्ण पडला नाही. दरम्यान स्फोटानंतर आता पोकलेनच्या मदतीने उर्वरित पुल पाडण्याचे काम सुरू झाले आहे.

पुल पडल्याची अधिकृत घोषणा नाही 

पुल पडल्याची अधिकृत घोषणा अद्याप झालेली नाही. आवाज येऊन ब्लास्ट झाला आहे पुलाची पाहणी करण्यासाठी अधिकारी धावले आहेत. पूलचा मूळ ढाचा तसाच आहे. कामगारांनी दिलेल्या माहितीनुसार काल जे ड्रिल घेण्यात आले होते, त्यात कालच्या पावसामुळे खूप पाणी गेलं होतं. त्यामुळे ब्लास्ट कमी प्रमाणात झाला आहे.

फक्त धुरळा.. पूल पडलाच नाही?

बरोबर एक वाजता स्फोट झाला अन चांदणी चौकातील वाहतूकीला अडचण ठरणारा जूना पूल पाडण्यासाठी स्फोट करण्यात आला. यावेळी मोठ्या प्रमाणात धुराचे लोट आकाशात उडाल्याचे पाहायला मिळाले. दरम्यान स्फोट झाल्यानंतर फक्त धुरळा उडाला कंपनीचा बोर्डही पडला नाही अशी प्रतिक्रिया कामगारांनी दिली आहे.

काही क्षणात पूल पाडला जाणार

अग्निशमन दलाकडून देखील या परिसराची पाहणी करण्यात आली आहे. या पुलावर जिओ टेक्सटाईल मटेरियल देखील लावण्यात आले आहे. ब्लास्ट झाल्यानंतर जो राडाराडा आहे तो सगळीकडे पसरू नये म्हणून या मटेरियलचा वापर करण्यात येतो. दरम्यान अगदी काही क्षणात हा पूल पाडला जाणार आहे.

मुंबई-बंगळुरू महामार्गावरील वाहतूक बंद 

पुणे शहरात मुंबई-बंगळुरू महामार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे. काही वेळातच चांदणी चौकातील जुना पूल पाडला जाणार.

मुंबई-पुणे 'एक्सप्रेस वे' वरील वाहने अडविण्यास सुरुवात 

मुंबई पुणे 'एक्सप्रेस वे' वरील उर्से टोल नाका येथे जड वाहने अडविण्यास सुरुवात झाली आहे. यामुळे काही वेळातच वाहनांच्या लांब पर्यंत रांगा लागल्या आहेत. तर हलकी वाहने उसे खिंडीतून जुन्या महामार्गावर सोडली जात आहेत.

जड वाहने डाव्या बाजूच्या दोन लेनमध्ये उभी करून उरलेल्या एका लेनमधून हलकी वाहने पुढे सोडण्यासाठी वाहतूक पोलिसांचे प्रयत्न सुरू.

चांदणी चौक परिसरातील वाहतूक बंद

चांदणी चौक पूल पाडण्यासाठी पुणेकरांनी गर्दी करू नये असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. या परिसरात कलम 144 देखील लागू असून पोलीस कर्मचाऱ्यांसह रॅपिडक्शन फोर्स देखील तैनात करण्यात आली आहे. दरम्यान रात्री एक ते दोन दरम्यान चांदणी चौक पाडण्यात येणार असून संपूर्ण परिसर निर्मनुष्य केला जात आहे. यावेळी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात केला गेला असून वाहनचालकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा असे पोलिसांकडून आव्हान करण्यात येत आहे.

अवघ्या ६ सेकंदात पाडला जाईल पूल

पुण्यातील चांदणी चौकातील पूल अवघ्या ६ सेकंदात पाडला जाणार आहे, यासाठी कंट्रोल ब्लास्ट करण्यात येणार आहे. त्यासाठी खास एक्सप्लोडर आण्यात आले असून उरळी कांचनचे वेंकटेश महाडिक हे ब्लास्ट करणार आहेत. गेल्या २२ वर्षांपासून महाडिक हे एक्सप्लोडर ऑपरेटर म्हणून काम करत आहेत.

पुलाचा राडारोडा उचलण्यासाठी आठ पोकलेन मशीन सज्ज

वारजे : चांदणी चौकातील पूल पाडल्यानंतर रस्ता रिकामा करण्यासाठी आठ पोकलेन मशीन तयार ठेवण्यात आल्या आहेत. तर शेकडो कामगार हेल्मेट घालून तयार आहेत. दरम्यान महामार्गावर वाहतूक कमी झालेली 

पुलावरील प्रत्येक हालचालीवर पोलिसांचं लक्ष

चांदणी चौकातील पुल पाण्यासाठी यंत्रणा सज्ज झाली आहे. सध्या पुलाखालील वाहतूक तुरळक दिसत आहे. तसेच पुलाजवळी प्रत्येक हालचालीवर पोलीस प्रशासन लक्ष ठेवून आहे.

पुणे : पूल पाडण्यापूर्वी दोनशे मीटरचा परिसर निर्मनुष्य करण्यात आला होता. पूल पाडण्यासाठी दीड ते दोन मीटर लांबीचे आणि साधारण ३५ मिलिमीटर व्यासाचे १ हजार ३०० छिद्रे पाडण्यात आले होते. पूल पाडण्यासाठी तब्बल ६०० किलो इमल्शन स्फोटकांचा उपयोग करण्यात आला. स्फोटानंतर पुलाचा अर्धा भाग पाडण्यात आला नंतर पोकलेन मशीनच्या सहायाने उरलेला पूल पाडण्यात आला. अखेर २ वाजून ३३ मिनीटांनी चांदणी चौकातील पुल पडला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com