

Homeless Encroachments Near Chaturshringi Temple Cause Public Distress
Sakal
शिवाजीनगर : सेनापती बापट रस्त्यावरील चतुःश्रृंगी देवी मंदिरासमोरील पदपथावर बेघर लोकांनी अतिक्रमण करून तात्पुरता संसार थाटल्याने परिसरात अस्वच्छता व गैरसोयीचे वातावरण निर्माण झाले आहे. चतुःश्रृंगी देवीच्या दर्शनासाठी दररोज राज्याच्या विविध भागांतून हजारो भाविक मंदिरात येतात. मात्र, मंदिर परिसरात बेघर लोक भाविकांच्या मागे लागून पैसे मागत असल्याने अनेक नागरिक त्रस्त झाले आहेत.