राज्य फीडे मानांकन बुद्धिबळ

राज्य फीडे मानांकन बुद्धिबळ
Published on

फोटो ः Media Ids : PNE26W19514

वीरेश, मानस, अथर्व, भूवन, प्रथम, आदित्यचे विजय
राज्य फीडे मानांकन बुद्धिबळ

पुणे, ता. १५ ः पुणे जिल्हा बुद्धीबळ सर्कल आयोजित एकोणीस वर्षांखालील खुल्या व मुलींची गटाच्या राज्य निवड चाचणी बुद्धिबळ स्पर्धेत
खुल्या गटात तिसऱ्या फेरीत वीरेश शरणार्थी, मानस गायकवाड, अथर्व सोनी, भुवन शितोळे, प्रथम गुप्ता, आदित्य चव्हाणने विजय मिळविले.
एच २ ई पॉवर सिस्टीमच्या सहकार्याने कर्वेरोड येथील श्री गणेश सभागृह आणी अश्‍वमेध हॉलमध्ये सुरू झालेल्या या स्पर्धेत मुलींच्या गटात आरणा गुप्ता, सई पाटील, दिशा पाटील, श्रावणी उंडाळेने विजय मिळविले.
या स्पर्धेचे उद्घाटन राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते झाले. यावेळी नगरसेवक सुनील पांडे-लोहगांवकर, मिताली साळवेकर, कुलदीप साळवेकर, महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेचे सचिव निरंजन गोडबोले, पुणे जिल्हा बुद्धीबळ सर्कलचे प्रकाश कुंटे, हर्निश राजा, शेखर जोरी, राजेंद्र शिदोरे हे उपस्थित होते.
तिसऱ्या फेरीचे काही निकाल :
खुला गट : रेयान मर्चट (२ गुण) पराभूत विरुद्ध वीरेश शरणार्थी (३ गुण), मानस गायकवाड (३ गुण) वि. वि. अक्षय जोगळेकर (२ गुण), वरद पाटील (२.५ गुण) बरोबरी विरुद्ध राम परब (२.५ गुण), अथर्व सोनी (३ गुण) वि. वि. वरद मोरे (२ गुण), राम लतिक (२.५ गुण) बरोबरी विरुद्ध अयान सोमाणी (२.५ गुण), भुवन शितोळे (३ गुण) वि. वि. आरव मेहता (२ गुण), प्रथम गुप्ता (३ गुण) वि. वि. सुदीप पाटील (२ गुण), पलाश सुयोग मापारा (२.५ गुण) बरोबरी विरुद्ध ऋतुराज धोत्रे (२.५ गुण), श्रीरंग आघारकर (२.५ गुण) बरोबरी विरुद्ध विक्रमादित्य चव्हाण (२.५ गुण), आदित्य चव्हाण (३ गुण) वि. वि. अथर्व कदम (२ गुण).
मुली : श्रेया हिप्परगी (२ गुण) पराभूत विरूद्ध आरणा गुप्ता (३ गुण), सारा हरोळे (२.५ गुण) बरोबरी विरुद्ध श्रद्धा बजाज (२.५ गुण), सई पाटील (३ गुण) वि. वि. सई देव (२ गुण), मयंका राणा (२ गुण) पराभूत विरुद्ध दिशा पाटील (३ गुण), श्रावणी उंडाळे (३ गुण) वि. वि. ज्ञानदा गुजराती (२ गुण), सारा पाटील (२ गुण) पराभूत विरुद्ध दृष्या नाईक (३ गुण), भूमिका वाघळे (३ गुण) वि.वि. मानसी टिळेकर (२ गुण), अन्विका घोडेस्वार (२ गुण) पराभूत विरुद्ध ईश्वरी जगदाळे (३ गुण), शिफा शेख (२.५ गुण) बरोबरी विरुद्ध सान्वी गोरे (२.५ गुण), स्पृहा कासार (२ गुण) पराभूत विरुद्ध राजेश्वरी देशमुख (२.५ गुण).
----------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com