पुणे : शहरातील मोहनवाडी परिसरात घरगुती गॅस सिलेंडरमधून (Gas Cylinder) गॅस काढून ग्राहकांची फसवणूक करणाऱ्या गॅस वितरण कर्मचाऱ्यावर अखेर कारवाई झाली आहे. अखिल भारतीय छावा संघटनेच्या (Chhava Sanghatana) सतर्कतेमुळे ही फसवणूक उघड झाली असून, तीन लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.