

पुणे, ता. १९ : खड्ड्यामुळे एका लहान मुलाचा मृत्यू झाल्याने महापालिकेच्या पथ विभागाच्या कारभारावर तीव्र संताप व्यक्त होत आहे. सर्व साधनसामग्री उपलब्ध असतानाही गेल्या तीन महिन्यांत खड्डे का बुजवले नाहीत, असा सवाल करत माजी नगरसेवकांनी आयुक्तांकडे खुलाशाची मागणी केली आहे.
पथ विभागाकडे स्वतःचा हॉटमिक्स प्लांट, यंत्रसामग्री आणि मनुष्यबळ असतानाही केवळ निविदा प्रक्रियेवर भर दिला जात असल्याचा आरोप माजी विरोधी पक्षनेते उज्ज्वल केसकर, सुहास कुलकर्णी आणि माजी नगरसेवक प्रशांत बधे यांनी केला आहे. गेल्या तीन महिन्यांत प्लांटमध्ये किती डांबराचे उत्पादन झाले आणि क्षेत्रीय कार्यालयांना किती पुरवठा झाला, याची माहिती जाहीर करण्याची मागणी त्यांनी निवेदनाद्वारे केली आहे.
आयुक्तांनी हॉटमिक्स प्लांटला तातडीने भेट देऊन तेथील कामकाज आणि नोंदवहीची तपासणी करावी. खड्डे बुजविण्याची जबाबदारी केवळ क्षेत्रीय कार्यालयांवर ढकलून मुख्य खाते आपली जबाबदारी झटकू शकत नाही, असेही निवेदनात स्पष्ट केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.