Pune childrens day : पुण्यात 1800 विद्यार्थी चालत जाऊन बालदिन करणार साजरा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Pune childrens day

Pune childrens day : पुण्यात 1800 विद्यार्थी चालत जाऊन बालदिन करणार साजरा

पुणे : चालण्याचा व्यायाम लोकप्रिय करण्यासाठी आणि शालेय विद्यार्थ्यांमध्ये त्याबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी येत्या बालदिनी (ता. 14 नोव्हेंबर) अभिनव उपक्रम आयोजित करण्यात आला आहे.

' वॉक इट आऊट, टॉक इट आऊट' ग्रुप आणि एरंडवण्यातील शामराव कलमाडी हायस्कूलतर्फे विद्यार्थ्यांनी घरापासून शाळेत चालत यावे यासाठी त्यांना प्रोत्साहन देण्यात येणार आहे. त्या अंतर्गत सुमारे 1800 विद्यार्थी चालत शाळेत जाणार आहेत.

या उपक्रमात सहभागी होण्यासाठी अनेक नागरिक उत्स्फूर्तपणे स्वयंसेवक म्हणून नोंदणी करीत असून ते देखील त्यात सहभागी होणार आहेत, अशी माहिती ग्रुपच्या संचालिका नेहा येवले आणि शामराव कलमाडी हायस्कूलच्या प्रिन्सिपल पल्लवी नाईक यांनी दिली.

येत्या सोमवारी सकाळी सहा वाजता सुरू होणाऱ्या या उपक्रमात कोथरूड परिसरात स्वयंसेवक हवे आहेत. शिक्षक आणि स्वयंसेवकांच्या मदतीने 1800 हून अधिक शालेय विद्यार्थी सुमारे दोन किलोमीटर अंतर चालणार आहेत. त्यासाठी अणखी स्वयंसेवकांची आवश्यकता आहे. सर्व वयोगटातील इच्छुकांनी ' वॉक इट आऊट, टॉक इट आऊट' ग्रुपच्या फेसबुक, इंस्टाग्राम पेजवर संपर्क साधावा, असे आवाहन त्यांनी केले आहे.या बाल दिनाच्या निमत्ताने सर्वांनी या उपक्रमात सहभागी होत निसर्ग पूरक व पर्यावरण व आरोग्यदायी जीवनशैलीचा आनंद घ्यावा, असे आवाहन येवले यांनी केले आहे.