वाघोलीत साडेआठ लाखांच्या सिगारेटची चोरी

वाघोलीत साडेआठ लाखांच्या सिगारेटची चोरी
Published on

पुणे, ता. २० : दुकानाचे शटर उचकटून चोरट्यांनी विविध कंपन्यांच्या सिगारेटचे तब्बल ८ लाख ५७ हजार २९० रुपये किमतीचे बॉक्स चोरून नेले. ही घटना १८ व १९ ऑगस्टदरम्यान वाघोली परिसरात घडली.
याप्रकरणी महेंद्र पुखराज चौधरी (वय ४२) यांनी वाघोली पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार चोरट्यांवर गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, तक्रारदारांचे वाघोली गावठाण परिसरात ‘आर्यन प्लास्टिक’ नावाचे दुकान आहे. दुकान बंद असल्याची संधी साधून चोरट्यांनी शटर उचकटून आत प्रवेश केला. त्यानंतर विविध कंपन्यांच्या सिगारेटचे आठ लाख ५७ हजार २९० रुपये किमतीचे बॉक्स चोरून नेले.

चांदीची मूर्ती, रोकड चोरीला
लुल्लानगर परिसरातील एका कार्यालयाचे शटर उचकटून चोरट्याने चांदीची महालक्ष्मीची मूर्ती आणि रोकड असा सुमारे ४० हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. याप्रकरणी गणेश मोहन गायकवाड (वय ३६) यांनी वानवडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असून, चोरट्यावर गुन्हा दाखल झाला आहे. मोहित प्लाझामधील ‘स्टुडिओ लीगल’ या कार्यालयात ही चोरी झाली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com