मास्कच्या ‘ॲलर्जी’वाल्यांना ४३ कोटींचा दंड

जिल्ह्यात साडेनऊ लाख जणांवर दंडाचा बडगा : सर्वाधिक पुणेकरांचा समावेश
Mask
Masksakal

पुणे : अगदी कोरोनाबाबतच्या (corona) कडक निर्बंधांच्या काळातही जिल्ह्यातील सुमारे साडेनऊ लाखांहून अधिक नागरिकांना मास्कची ‘ॲलर्जी’ असल्याचे पोलिस, पालिका, नगरपालिका आणि ग्रामपंचायत प्रशासनाच्या निदर्शनास आले आहे. कोरोना प्रतिबंधासाठी मास्कची सक्ती असूनही या नागरिकांनी मास्क वापरणे जाणीवपूर्वक टाळले आहे. या सर्व बेशिस्त नागरिकांना तब्बल ४३ कोटी ४८ लाख २ हजार ११३ रुपयांचा दंड करण्यात आला आहे. दंडात्मक कारवाई झालेल्यांमध्ये सर्वाधिक म्हणजेच ५ लाख ५९ हजार ३६० पुणेकरांचा (pune) समावेश आहे. मागील सोळा महिन्यांतील ही दंडात्मक कारवाई आहे. (pune citizens 43 frore fine for mask)

आतापर्यंत साडेपाच लाखांहून अधिक पुणेकरांकडून सर्वाधिक २७ कोटी ४५ लाख २२ हजार २८० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. शहर व जिल्ह्यातील कोरोना संसर्ग आटोक्यात आणण्यासाठी मागील सोळा महिन्यांपासून सातत्याने प्रयत्न केले जात आहेत. यानुसार रस्त्यावरील गर्दी कमी करण्यासाठी संचारबंदीचा अवलंब करणे, सार्वजनिक ठिकाणी वावरताना मास्कचा वापर करणे, शाळा, महाविद्यालये, हॉटेल, जीम, सार्वजनिक वाहतूक सेवा बंद ठेवणे आणि अत्यावश्‍यक सेवा वगळता अन्य सर्व दुकाने आणि आस्थापना बंद ठेवणे यासारख्या विविध उपाययोजना केल्या जात आहेत. या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांकडून पुणे व पिंपरी चिंचवड महापालिका प्रशासन, ग्रामपंचायत, नगरपालिका प्रशासन आणि पोलिसांकडून सातत्याने दंडात्मक कारवाई केली जात आहे.

Mask
पुणे : शहरात रात्री अकरा वाजल्यानंतर संचारबंदी

पुणे महापालिकेने शहरातील २७ हजार ७६२ पुणेकरांकडून १ कोटी ३३ लाख ८३ हजार ९३० रुपयांचा तर, पुणे शहर पोलिसांनी ५ लाख ३१ हजार ५९८ नागरिकांकडून २६ कोटी ११ लाख ८८ हजार ३५० रुपये असा एकूण २७ कोटी ४५ लाख ७२ हजार २८० रुपये दंड वसूल केला आहे. पुणे व पिंपरी चिंचवड शहरात महापालिका आणि पोलिस प्रशासनाकडून ही दंड आकारणी करण्यात आली आहे. जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील ग्रामपंचायतींच्या हद्दीत ग्रामपंचायत आणि पोलिस प्रशासनाने ही दंडात्मक कारवाई केली आहे. जिल्ह्यातील नगरपालिका हद्दीत ग्रामीण पोलिसांकडून ही कारवाई कऱण्यात आली आहे.

Mask
पुणे : कोव्हॅक्सिनचे साडे सहा हजार डोस उपलब्ध

क्षेत्रनिहाय दंड झालेल्या व्यक्ती व दंडाची रक्कम (रुपयांत)

पुणे शहर -५ लाख ५९ हजार ३०० -२७ कोटी ४५ लाख ७२ हजार २८०

पिंपरी चिंचवड - १ लाख ९९६ - ५ कोटी ६७ लाख ७७ हजार ९९८

जिल्हा परिषद - २ लाख ७ हजार ८७६ --७ कोटी ३८ लाख २० हजार ६००

नगरपालिका --८३ हजार ६९९ --२ कोटी ९६ लाख ३१ हजार २३५

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com