रविवारी रात्री नऊ ते सोमवारी पहाटे पाचपर्यंत नागरीकांना बाहेर फिरण्यास बंदी 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 22 मार्च 2020

 कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी रविवारी रात्री नऊ वाजल्यापासून ते सोमवारी पहाटे पाच वाजेपर्यंत शहरामध्ये 144 कलमाअंतर्गत संचारबंदीचा आदेश देण्यात आला आहे.

पुणे - कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी रविवारी रात्री नऊ वाजल्यापासून ते सोमवारी पहाटे पाच वाजेपर्यंत शहरामध्ये 144 कलमाअंतर्गत संचारबंदीचा आदेश देण्यात आला आहे. पोलिस सहआयुक्त डॉ.रवींद्र शिसवे यांनी हा आदेश काढला आहे. त्यामध्ये कोणत्याही कारणासाठी नागरीकांना शहरामध्ये फिरता येणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. 

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानुसार, रविवारी शहरामध्ये "जनता कर्फ्यु'ला पुणेकरांनी उत्स्फुर्त प्रतिसाद दिला. दरम्यान, दिवसभर शहरामध्ये शांतता होती, मात्र कोरोनाशी लढणाऱ्या वैद्यकीय क्षेत्रातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना अभिवादन करण्यासाठी नागरीक सायंकाळी पाच वाजता मोठ्या संख्येने रस्त्यावर आले होते. असा प्रकार पुन्हा घडू नये, यादृष्टीने पोलिसांकडून प्रयत्न केले जात आहे. 

Video : पुणेकर नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

या पार्श्‍वभुमीवर, जनता कर्फ्यु रात्री नऊ वाजता संपला. त्यानंतर नागरीक पुन्हा रस्त्यावर येण्याची शक्‍यता लक्षात घेऊन डॉ.शिसवे यांनी रविवारी रात्री नऊ ते सोमवारी पहाटे पाच या वेळेत नागरीकांनी बाहेर पडू नये, यासाठी फौजदारी दंड संहिता अंतर्गतच्या 144 कलम लागू केला. डॉ.शिसवे यांनी दिलेल्या आदेशानुसार, रविवारी रात्री नऊ वाजल्यापासून ते सोमवारी पहाटे पाच वाजेपर्यंत शहरातील नागरीकांनी कोणत्याही कारणास्तव रस्त्यावर, गल्लोगल्ली संचार करण्यास, वाहतुक, फिरणे, उभे राहणे, थांबून राहणे व रेंगाळणे या सर्व कृत्यास मनाई करण्यात आली होती. त्यातून अत्यावश्‍यक सेवा वगळण्यात आल्या होत्या. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pune Citizens are not allowed to move out from nine to five on Sunday night

टॅग्स
टॉपिकस
Topic Tags: