पुणे : तळजाई टेकडीवरील प्रकल्पास नागरिकांचा विरोध

तळजाई  बचाव अभियानास नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद
पुणे : तळजाई टेकडीवरील प्रकल्पास नागरिकांचा विरोध
sakal

सहकारनगर : तळजाई  टेकडीवरील प्रस्ताविक जैवविविधता वसुंधरा प्रकल्पास सहकारनगर भागातील पर्यावरण प्रेमी, सहकारनगर नागरिक मंच,सहकारनगर बचाव अभियान या नागरिकानी रविवारी सकाळी तळजाई टेकडीवर स्वाक्षरी मोहीम राबवून या प्रकल्पास विरोध दर्शवला आहे. या प्रकल्पामुळे परिसरातील मूळ जैवविविधता नष्ट होण्याची भीती आहे त्यामुळे हा प्रकल्पच रद्द करण्यासाठी नागरिकांनी तळजाई बचाव अभियान मोहिम राबवली. या तळजाई बचाव अभियानास नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत दोन हजार स्वाक्षरी मोहीम यशस्वीपणे राबवली.

पुणे : तळजाई टेकडीवरील प्रकल्पास नागरिकांचा विरोध
मुख्यमंत्र्यांकडून मराठवाड्यातील दोन कोटी जनतेची दिशाभूल - मनसे

सहकारनगर भागातील तळजाई टेकडी वरील सुमारे १०७  (एकशे सात एकर) जागेवर नियोजित जैवविविधता वसुंधरा प्रकल्पाचा विस्तृत प्रकल्प आराखडा (डीपीआर)पुणे महापालिका प्रशासनाने स्थायी समितीकडे मंजुरीसाठी सादर करुन या प्रकल्पास 120 कोटी खर्च केला जाणार आहे. त्यामुळे हा प्रकल्प करण्यास सहकारनगर भागातील पर्यावरण प्रेमींचा व सहकारनगर नागरिक मंच,सहकारनगर बचाव अभियान या नागरिकांचा या प्रकल्पास विरोध दर्शवला आहे.यासाठी ही मोहीम राबवण्यात आली असल्याचे सहकारनगर नागरिक मंच यांनी सांगितले.

पुण्यातील ऑक्सीजन  पार्क म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तळजाई टेकडीवर 110 एकर जागेत तब्बल 120 कोटी रुपये खर्च करून विकासकामे करण्याचे महापालिकेचे धोरण असल्याने याबाबत विकास आराखडा मंजूर केला यामुळे याच्या विरोधात सहकारनगर नागरिक मंच व तळजाई बचाव अभियान यानी  पुढाकार घेऊन रविवारी सकाळच्या वेळी तळजाई टेकडीवर हजारो नागरिक पर्यावरप्रेमी, निसर्गप्रेमी तळजाई टेकडीवर फिरायला येतात त्यामुळे या तळजाई टेकडीची जैवविविधता नैसर्गिक दृष्ट्या जशी आहे तशी राहावी असे पर्यावणप्रेमीं नागरिकांनी सांगतले.

"तळजाई टेकडी वरचा जैवविविधता समृद्ध असणारा निसर्गरम्य परिसर विकासाच्या नावाखाली उध्वस्त करण्याचा घाट असल्याने याठिकाणी बांधकामे करण्यासाठी मोठ्या प्रमाणात वृक्षतोड होणार व जमीन सपाटीकरण होणार,अनेक प्राणी पक्षी यांचा नैसर्गिक अधिवास नष्ट होणार हे उघड असल्याने या ठिकाणी या प्रकल्पास सहकारनगर नागरिक मंचचे व निसर्गप्रेमी यांनी विरोध दर्शवला आहे."

प्रकल्पात काय ?

नक्षत्र उद्यान,बांबू उद्यान,औषधी वनस्पतीचे उद्यान,सुगंधी वनस्पतीचे उद्यान, रानमेवा उद्यान, मसाला पदार्थ उद्यान आणि पुष्प उद्यान अशी  सात उद्याने, पक्षी निरीक्षण केंद्र सायकल ट्रॅक,गुरुकुल पद्धतीची ग्रीन  शाळा, महिलांसाठी स्वतंत्र क्रीडांगण, स्वतंत्र व्यायाम शाळा, फूड्स बाजार, क्रिकेट स्टेडियम, जॉगिंग ट्रक, म्युझियम, ग्रे वॉटर हार्वेस्टिंग प्रकल्प, 300 वॅट वीज निर्मितीसाठी सोलर रुफ पॅनेल प्रकल्प, सेंद्रिय शेती पथ दर्शक प्रकल्प, नर्सरी, पार्कींग व्यवस्था आदींचा समावेश आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com