Zebra
ZebraSakal

पुणेकरांना वर्षभरात पाहायला मिळणार झेब्रा

काही दिवसांपूर्वी नॅशनल झू ऑथॉरिटीने पुण्यातील राजीव गांधी प्राणी संग्रहालयात झेब्रा आणि जिराफ आणण्यासाठी परवानगी दिली होती.
Summary

काही दिवसांपूर्वी नॅशनल झू ऑथॉरिटीने पुण्यातील राजीव गांधी प्राणी संग्रहालयात झेब्रा आणि जिराफ आणण्यासाठी परवानगी दिली होती.

कात्रज - काही दिवसांपूर्वी नॅशनल झू (National Zoo) ऑथॉरिटीने पुण्यातील राजीव गांधी प्राणी संग्रहालयात (Rajiv Gandhi Animal Zoo) झेब्रा (Zebra) आणि जिराफ (Giraffe) आणण्यासाठी परवानगी दिली होती. त्यानुसार त्यांना ठेवण्यासाठी लागणाऱ्या खंदकाचे काम सुरु करण्यात आले. यासाठी महापालिकेकडून झेब्रासाठी बनविण्यात येणाऱ्या खंदकांसाठी निधी (Fund) उपलब्ध करुन देण्यात आला आहे. त्यानुसार सुरुवातीला झेब्रा आणण्यात येणार असून त्यानंतर जिराफ आणण्याबाबत निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती प्राणी संग्रहालय प्रशासनाने दिली आहे. त्यामुळे वर्षभरात पुणेकरांना झेब्रा पाहायला मिळणार आहे.

खंदकांसासाठी महापालिकडून १ कोटी ३५ लाख रुपयांचा निधी देण्यात आला असून त्याचे काम चालू आहे. एकूण एक ते सव्वा एकर जागेत हे खंदक असणार आहे. आपल्या देशातून एखादा प्राणी आणायचा असेल तर प्राण्यांची अदलाबदल करुन आणण्यात येतो. मात्र झेब्रा आणि जिराफ हे दोन्ही प्राणी बाहेर देशातून आणावे लागणार असल्याने त्याची खरेदी करावी लागणार आहे. त्यामुळे खंदकाचे काम पूर्ण झाल्यानंतर किती निधीची तरतूद करण्यात येते. यावर किती जोड्या आणायचा याबाबत निर्णय घेण्यात येणार आहे.

Zebra
कोल्हापूरच्या डॉ. अभिनंदन पाटील यांची इंटरनॅशनल बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद

पुणे शहरातील पर्यटकांसह आजूबाजूंच्या नागरिकांसाठी ही एक पर्वणी ठरणार आहे. सद्यस्थितीत पर्यटकांना एखाद्या लांबच्या वन्यजीव पर्यटनस्थळी जाऊन असे प्राणी पाहावे लागतात. त्यामुळे कात्रजच्या प्राणीसंग्रहालयात झेब्रा आणि जिराफ पाहता आल्यास पर्यटकांचा खर्च आणि वेळही वाचणार आहे.

प्रतिक्रिया

कात्रजच्या प्राणी संग्रहालयात झेब्रा आणि जिराफ आणण्याबाबत झालेल्या निर्णयानंतर काही प्राणीमित्रांनी यासाठी विरोध दर्शविला होता. मात्र, झेब्रा प्राण्यासाठी लागणाऱ्या खंदकाचे काम सुरु असल्याने जिराफ आणण्यासाठी वेळ लागला तरी झेब्रा पाहण्यासाठी पर्यटकांना जास्त वेळ वाट पाहावी लागणार नाही.

- अशोक घोरपडे, मुख्य उद्यान अधिक्षक

सुटीच्या दिवशी २० ते ४० रुपयांच्या तिकीटात आम्हाला कात्रजच्या प्राणी संग्रहालयात अनेक प्राणी पाहण्याचा आनंद घेता येतो. त्यातच आता असे नवनवीन प्राणी पाहायला मिळणार असतील तर आणखीनच आनंदात भर पडणार आहे. वरवर प्राण्यांची संख्या कमी होत आहे. अशातच या डिजीटल युगात लहान मुले असे प्राणी केवळ टीव्ही किंवा मोबाईलवरच पाहतात. त्यांनाही प्रत्यक्ष प्राणी पाहण्याचा आनंद घेता येणार आहे. त्यामुळे झेब्रा आणि जिराफ येण्याची उत्सुकता आहे.

- विनोद रांजणे, पर्यटक

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com