पीएमपी सुरू करण्याबाबत झाला महत्त्वाचा निर्णय; कधी सुरू होणार बससेवा?

PMPML_Bus
PMPML_Bus

पुणे : पुणे शहरातील पीएमपीची वाहतूक सेवा या महिन्यात तरी सुरू होण्याची चिन्हे नाहीत. ही सेवा ऑगस्ट महिन्यात सुरू होऊ शकते, असे पीएमपीतर्फे गुरुवारी (ता.२) स्पष्ट करण्यात आले. मात्र, वाहतूक सुरू करण्याची सर्व तयारी प्रशासनाने पूर्ण केली आहे. 

कोरोनाच्या उद्रेकामुळे पीएमपीची शहरातील वाहतूक सेवा 18 मार्चपासून टप्प्याटप्प्याने बंद करण्यात आली आहे. पिंपरी चिंचवडमधील सेवाही तेव्हापासून बंद होती. मात्र, राज्य सरकारने पिंपरी चिंचवडला रेड झोनमधून वगळल्यानंतर 26 मेपासून तेथील वाहतूक सुरू करण्यात आली आहे. मात्र, पुण्यातील वाहतूक अद्याप सुरू झालेली नाही. ही वाहतूक सुरू करावी, अशी मागणी पीएमपीचे संचालक आणि नगरसेवक शंकर पवार यांनीही महापालिका आयुक्तांकडे केली आहे. शहरात रिक्षा वाहतूक सुरू आहे मग पीएमपी का बंद ठेवली जाते, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केली होता. मात्र, महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांनी या वाहतुकीला अद्याप परवानगी दिलेली नाही. 

या पार्श्वभूमीवर पीएमपीमधील आगार प्रमुखांची बैठक गुरुवारी वाहतूक व्यवस्थापक अनंत वाघमारे यांनी घेतली. त्यात वाहतुकीबाबत चर्चा झाली. शहरात सध्या अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांच्या वाहतुकीसाठी बससेवा सुरू आहे. शासकीय कार्यालयांतील उपस्थिती वाढू लागल्याने आता या सेवेला गर्दी होऊ लागली आहे. त्यामुळे सध्या 100 ऐवजी आणखी किमान 20 बस गरजेनुसार वाढविण्याचा निर्णय झाला. तसेच पिंपरी चिंचवडमध्ये 80 बसची वाहतूक सुरू आहे. त्यातही प्रवाशांची गर्दी वाढली तर, बस संख्या वाढविण्याचा निर्णय झाला.

पुणे महापालिकेने परवानगी दिली, तर शहरातील वाहतूक किमान 30 मार्गांवर सुरू करण्याचे नियोजन प्रशासनाने तयार केले आहे, असेही वाघमारे यांनी स्पष्ट केले. शहरातील ज्या भागात प्रतिबंधित क्षेत्र आहे, तेथे बसची वाहतूक होणार नाही. मात्र, अन्य भागात वाहतूक होऊ शकते, असेही त्यांनी स्पष्ट केले. मात्र, या बाबत विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर, जिल्हाधिकारी नवल किशोर राम, महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांनी सूचना दिल्यावर अंतिम आदेश घेतले जातील, असेही त्यांनी स्पष्ट केले.  

पिंपरी चिंचवडमध्ये सुरू करण्यात आलेल्या प्रवासी वाहतुकीला फारसा प्रतिसाद मिळालेला नाही, असेही त्यांनी सांगितले. बसमध्ये प्रवासी घेताना क्षमतेच्या निम्मेच प्रवासी सध्या घेतले जात आहेत. तसेच प्रत्येक आसनावर एकाच प्रवाशाला बसण्यासाठी परवानगी दिली जात आहे. राज्य सरकारने दिलेल्या सोशल डिन्स्टन्सिंगच्या नियमांची काटेकोर अंमलबजावणी करण्याच्या सूचना अधिकारी आणि कर्मचाऱयांना देण्यात आल्या आहेत, असेही वाघमारे यांनी सांगितले. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com