

Pune's Minimum Temperature Drops
Sakal
पुणे : गेल्या काही दिवसांपासून वातावरणात चांगलाच गारवा वाढला असून, शहरात मंगळवारी किमान तापमान १३.४ अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले. पुढील दोन ते तीन दिवस किमान तापमान १३ अंशांच्या आसपास स्थिर राहण्याची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तविली आहे. त्यामुळे शहरात थंडीचा कडाका वाढणार आहे.