Pune City Corona: रुग्णांची संख्या पहिल्यांदा पन्नाशीच्या आत

पुणे शहरातील दिवसातील नवीन कोरोना रुग्णांची संख्या सोमवारी (ता.२८) पहिल्यांदा पन्नाशीच्या आत आली आहे.
PMC Corona
PMC Corona Sakal

पुणे : पुणे शहरातील दिवसातील नवीन कोरोना रुग्णांची संख्या सोमवारी (ता.२८) पहिल्यांदा पन्नाशीच्या आत आली आहे. शहरात दिवसभरात केवळ ४४ नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. शिवाय जिल्ह्यात दिवसभरात कोरोनाचे शून्य मृत्यू झाले आहेत. पुणे जिल्ह्यात दिवसभरात एकूण १०५ नवे रुग्ण आढळून आले असून २४० जणांनी कोरोनावर मात केली आहे. (Pune City Corona Updates)

यामुळे जिल्ह्यातील एकूण सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या आता २ हजार १७७ झाली आहे. एकूण सक्रिय कोरोना रुग्णांपैकी शहर व जिल्ह्यातील २८२ रुग्णांवर विविध रुग्णालयांत उपचार सुरू आहेत. उर्वरित १ हजार ८९५ जण गृहविलगीकरणात आहेत. दिवसातील एकूण नवीन रुग्णांमध्ये शहरातील ४४ रुग्णांबरोबरच पिंपरी चिंचवडमधील ३०, जिल्हा परिषद कार्यक्षेत्रात २१, नगरपालिका हद्दीत १० नवे रुग्ण आढळून आले आहेत. सोमवारी दिवसभरात कॅंटोन्मेंट बोर्ड क्षेत्रात एकही नवीन कोरोना रुग्ण आढळून आलेला नाही.

PMC Corona
Operation Ganga: युक्रेनमधील १८२ भारतीय दिल्लीला रवाना

जिल्ह्यातील दिवसभरातील एकूण कोरोनामुक्तांमध्ये पुणे शहरातील सर्वाधिक १३१ जण आहेत. पिंपरी चिंचवडमधील ५१, जिल्हा परिषद कार्यक्षेत्रातील ३७, नगरपालिका हद्दीतील १९ आणि कॅंटोन्मेंट बोर्ड क्षेत्रातील दोघे जण आहेत. पुणे शहरातील एकूण सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या सोमवारी (ता.२८) बाराशेच्या आत आली आहे. सध्या शहरात एकूण १ हजार १४५ सक्रिय कोरोना रुग्ण आहेत. शहरातील एकूण सक्रिय कोरोना रुग्णांपैकी शहरातील विविध रुग्णालयांमध्ये मिळून १२० रुग्णांवर उपचार सुरू आहेत. उर्वरित १ हजार २५ रुग्ण हे गृहविलगीकरणात आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com