esakal | पुणे शहरात कोरोना काळात ती नऊ हॉटेल वापरली कुणी?
sakal

बोलून बातमी शोधा

Dr Rajesh Deshmukh

पुणे शहरात कोरोना काळात ती नऊ हॉटेल वापरली कुणी?

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे - कोरोना काळात (Corona Period) डॉक्टर (Doctor) व आरोग्य सेवेतील कर्मचाऱ्यांना (Health Service Employee) निवास (Residence) व भोजनाची (Food) सोय उपलब्ध करणाऱ्या हॉटेलची बिले (Hotel Bill) जिल्हा प्रशासनाकडून आदा करण्यात येत आहेत. मात्र, या यादीत नऊ हॉटेलची कागदपत्रे (Documents) उपलब्ध नाहीत. यामुळे ही हॉटेल नेमके कोणासाठी उपलब्ध करून देण्यात आली, त्यांचे रेकॉर्ड का उपलब्ध होत नाही, असा प्रश्‍न निर्माण झाला आहे. (Pune City Corona Period Nine Hotels Use)

गेल्या वर्षी कोरोना काळात डॉक्टर, परिचारिका आणि वॉर्डबॉय यांना एक आठवडा ड्यूटी, तर एक आठवडा क्यॉरंटाइन ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यासाठी शहरातील सत्तर हॉटेल व्यावसायिकांची जिल्हा प्रशासनाने मदत घेतली. गेल्या नोव्हेंबरपर्यंत हॉटेल व्यावसायिकांकडून आरोग्य सेवेतील अधिकारी कर्मचाऱ्यांना ही सेवा दिली. त्यांचे सुमारे १८ कोटी रुपये बिल झाले आहे. जिल्हा प्रशासनाने ससून रुग्णालयाकडे बिलांची यादी पाठवून देत ते आदा करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

हेही वाचा: ''स्पर्धा परीक्षेच्याही पुढे जग आहे, याचा विद्यार्थ्यांनी विचार करावा''

रुग्णालयाने या यादीची तपासणी केली असता त्यामध्ये नऊ हॉटेलची कोणतीही माहिती आणि कागदपत्रे उपलब्ध नसल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. याबाबत जिल्हा प्रशासनाकडे विचारणा करूनही याबाबतची माहिती प्राप्त झाली नाही. दरम्यान, आतापर्यंत ४३ हॉटेल व्यावसायिकांचे बिल आदा करण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

ससून रुग्णालयास कागदपत्रे तपासण्याचे सूचना दिल्या आहेत. कोणती हॉटेल डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांसाठी उपलब्ध करून देण्यात आली, याबाबत सविस्तर माहिती

घेण्यात येईल.

- डॉ राजेश देशमुख, जिल्हाधिकारी

loading image