पुणे : पेठांत राहण्याचा खर्च झाला दुप्पट...!

शहराच्या मध्यवर्ती भागातील पेठांमध्ये मुलींच्या वसतिगृहाचे भाडे गेल्या काही वर्षांच्या तुलनेत गगनाला भिडले आहे. ही भाववाढ कोरोनानंतर तब्बल दुपटीने वाढली आहे.
Paying Guest
Paying GuestSakal
Summary

शहराच्या मध्यवर्ती भागातील पेठांमध्ये मुलींच्या वसतिगृहाचे भाडे गेल्या काही वर्षांच्या तुलनेत गगनाला भिडले आहे. ही भाववाढ कोरोनानंतर तब्बल दुपटीने वाढली आहे.

स्वारगेट - ‘मी गेली सहा वर्षे मध्यवर्ती भागात राहते. कोरोनाआधी मला साडेतीन हजार रुपये भाडे होते, ते आता सात हजार रुपये इतके झाले आहे, ही झालेली वाढ सर्वसामान्य घरातील मुलींच्या आवाक्याबाहेर आहे,’ असे विद्यार्थिनी ईशा शेंडगे सांगत होती.

शहराच्या मध्यवर्ती भागातील पेठांमध्ये मुलींच्या वसतिगृहाचे भाडे गेल्या काही वर्षांच्या तुलनेत गगनाला भिडले आहे. ही भाववाढ कोरोनानंतर तब्बल दुपटीने वाढली आहे. त्यामुळे पेठांत शिक्षणासाठी मुलींना राहणे फारच खर्चीक झाले आहे. या भागात अनेक शिक्षण संस्था व स्पर्धा परीक्षा कोचिंग क्लास असल्याने वसतिगृह व सदनिकांना मोठी मागणी असते.

सदाशिव पेठ, शनिवार, शुक्रवार, नारायण, कसबा, नवी पेठ, स्वारगेट जवळील आजूबाजूचा भागात अनेक स्पर्धा परीक्षा केंद्र व नामवंत शिक्षण संस्था आहेत, त्यामुळे या भागांत विद्यार्थी राहण्याला पसंती देतात. हा भाग शहराच्या मध्यभागी असल्याने विद्यार्थ्यांना सर्व पायाभूत सुविधा मिळत असल्याने राहण्यास अनुकूल वातावरण आहे. त्यामुळे या ठिकाणी हजारोंच्या संख्येत विद्यार्थिनी राहतात. मात्र, आता राहण्याच्या खर्चात वाढ झाल्याने विद्यार्थिनींचे महिन्याचे आर्थिक गणितच कोलमडले आहे. कोरोनाआधी खासगी वसतिगृहाचे भाडे साधारण अडीच ते साडेचार हजार रुपये होते, ते आता चार ते आठ हजारांपर्यंत गेले आहे. महिन्याचा एकूण खर्च राहण्यावर खर्च होत असल्याने सर्वसामान्य घरातील मुलींना मध्यवर्ती भागात राहणे अवघड झाले आहे.

का झाली भाडेवाढ?

  • वसतिगृहधारक भाड्याने सदनिका घेऊन चालवतात

  • देखभालीसाठी मोठा खर्च

  • वातानुकूलित रूमची मागणी

  • कोणत्या भागात ते हॉस्टेल आहे, यावरून दर ठरतो

  • वसतिगृह आकर्षक करण्यासाठी इंटेरियर डिझाइनवर मोठा खर्च

असे आहे भाडे (आकडे रुपयांत)

  • १५ ते २० हजार वन बीएचके फ्लॅट

  • ४ ते ८ हजार वसतिगृह : एक बेड

कोरोनामुळे गेल्या दोन वर्षांत आमचे प्रचंड नुकसान झाले. मात्र, पुन्हा पहिल्यासारखे चित्र निर्माण झाल्यामुळे आम्ही आमचा झालेला तोटा कसा भरून काढणार? घेतलेल्या पैशांच्या बदल्यात आम्ही तशा सुविधाही पुरवतो.

- हॉस्टेल मालक

मी परभणीची राहणारी आहे, इथे सर परशुराम कॉलेजला शिकते. मी कॉलेजजवळ असणारे वसतिगृह शोधले; पण या ठिकाणी सात हजार ते नऊ हजारांपर्यंत भाडे सांगितले. मात्र, माझी परिस्थिती नसल्याने एवढे भाडे भरू शकत नाही, म्हणून मी बालाजीनगरमधून कॉलेजला ये-जा करते.

- सृष्टी जाधव, विद्यार्थिनी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com