Pune : पुणे शहर, जिल्ह्यातील निराधार, ज्येष्ठांना सरकारी आर्थिक मदतीचा ‘आधार’

सामाजिक अर्थसाहाय्य योजनेंतर्गत ६९ हजार जणांना लाभ थेट खात्यात पैसे जमा होणार
pune
punesakal
Summary

सामाजिक अर्थसाहाय्य योजनेंतर्गत ६९ हजार जणांना लाभ थेट खात्यात पैसे जमा होणार

पुणे : पुणे शहर व जिल्ह्यातील निराधार आणि ज्येष्ठांना मिळून एकूण ६८ हजार ९७१ जणांना सरकारी मदतीचा ‘आधार’ मिळाला आहे. राज्य सरकारच्या विविध सामाजिक अर्थसाहाय्य योजनेंतर्गत जिल्ह्यातील या लाभासाठी पात्र असलेल्या व्यक्तींसाठी जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी ३५ कोटी ३९ लाख २ हजार १०० रुपयांचा निधी बुधवारी (ता.१२) वितरित केला आहे. या सर्व लाभार्थ्यांच्या थेट बॅंक खात्यात येत्या दोन दिवसात या आर्थिक मदतीची रक्कम जमा केली जाणार आहे.

यामध्ये संजय गांधी निराधार अनुदान आणि श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तिवेतन या दोन योजनांच्या लाभार्थ्यांचा समावेश आहे. राज्याच्या सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभागांतर्गत ही आर्थिक मदत योजना राबविण्यात येते. पुणे जिल्ह्यात सन २०२२-२३ या आर्थिक वर्षात या दोन्ही योजनांच्या लाभार्थ्यांना सप्टेंबर २०२२ ते डिसेंबर २०२२ या कालावधीतील आर्थिक मदतीची रक्कम वितरित करण्यात आली आहे.

हे अनुदान जिल्ह्यातील सर्व तहसील कार्यालयांना वितरित करण्यात आले आहे. सर्व पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यात त्वरित ही रक्कम जमा करण्याचा आदेश जिल्हाधिकारी डॉ.देशमुख यांनी सर्व तहसीलदारांना दिला आहे.

संजय गांधी निराधार अनुदान (सर्वसाधारण) आणि श्रावणबाळ सेवा योजना (सर्वसाधारण) या योजनेंतर्गत दिव्यांग, निराधार, परित्यक्ता, विधवा, घटस्फोटीत, ज्येष्ठ नागरिक, तृतीयपंथी आदी विविध प्रकारच्या दुर्बल घटकांना दरमहा आर्थिक मदत केली जात. शिवाय संजय गांधी निराधार अनुदान योजनेअंतर्गत अनुसूचित जाती, जमाती, श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तिवेतन योजनेतील अनुसूचित जाती, जमाती या लाभार्थ्यांचेसुद्धा ऑक्टोंबर २०२२ पर्यंतचे अनुदान याआधीच सर्व तहसील कार्यालयांना वितरित करण्यात आले आहे.

तालुकानिहाय वितरित अनुदान रुपयांत (कंसात लाभार्थ्यांची संख्या)

- आंबेगाव --- १ कोटी ५३ लाख २५ हजार (२ हजार ९९१).

- बारामती --- ५ कोटी २५ लाख ३८ हजार २०० (८ हजार ८९६).

- भोर --- २ कोटी ९६ लाख ९६ हजार ८०० (७ हजार ३८०).

- दौंड --- १ कोटी ८८ लाख ४८ हजार ६०० (३ हजार ९२२).

- इंदापूर --- २ कोटी ५४ लाख ६८ हजार ८०० (५ हजार ७१५).

- जुन्नर --- ३ कोटी २० लाख १२ हजार (५ हजार ६८२).

- मावळ --- १ कोटी ३५ लाख ५० हजार (३ हजार १३२).

- मुळशी --- १ कोटी ३५ लाख ५० हजार (२ हजार ७७२).

- पुरंदर --- २ कोटी ६१ लाख (५ हजार २६५).

- खेड --- २ कोटी ४७ लाख (४ हजार १६).

- शिरूर --- ३ कोटी ५९ लाख ६२ हजार ८०० (६ हजार ७६७).

- वेल्हे --- ६८ लाख (१ हजार ५३७).

- पुणे शहर --- १ कोटी ८८ लाख (४ हजार ५१४).

- हवेली --- ३ कोटी ४२ लाख (६ हजार ३८२).

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com