Pune Drainage Cleaning : पुणे शहरातील नाले सफाई कागदावरच; भाजपचा आरोप pune city drainage cleaning on paper bjps allegation | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

drainage cleaning

Pune Drainage Cleaning : पुणे शहरातील नाले सफाई कागदावरच; भाजपचा आरोप

पुणे - पावसाळा तोंडावर आलेला असला तरी शहरातील नाले सफाई कागदावरच असून, कामांची अवस्था अत्यंत बिकट आहे. उपायुक्तांच्या देखरेखीखाली नाले सफाई १५ दिवसात पूर्ण करा अशी मागणी महापालिका आयुक्तांकडे भाजपच्या शिष्टमंडळाने केली आहे.

भाजपचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांनी सोमवारी आयुक्त विक्रम कुमार यांची भेट घेतली. माजी आमदार बापू पठारे, माजी सभागृह नेते धीरज घाटे, सरचिटणीस दीपक पोटे, दत्ता खाडे, माजी नगरसेवक महेश वाबळे, प्रमोद कोंढरे, संतोष खांदवे, हेमंत लेले, पुष्कर तुळजापूरकर आदी उपस्थित होते.

पत्रकारांशी बोलताना मुळीक म्हणाले, ‘‘शहरात मुसळधार पाऊस झाला की लगेच पाणी तुंबते, त्यामुळे पुणेकरांना मोठा त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे आयुक्तांची भेट घेऊन हे काम व्यवस्थित करावे अशी मागणी केली. आम्ही प्रत्यक्ष जागेवर जाऊनही महापालिकेच्या कामाची पडताळणी करणार आहोत.

तर निवडणूक लढवेन

लोकसभा पोटनिवडणुकीच्या उमेदवारीबाबत मुळीक यांना विचारले असता मुळीक म्हणाले, मी पक्षाकडे उमेदवारी मागितलेली नाही. पक्षाने जबाबदारी दिल्यास मी निवडणूक लढवेन. कमळ हाच आमचा उमेदवार असून पक्ष ज्याला उमेदवारी देईल, त्याचा आम्ही प्रचार करू. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर पुणेकरांचा विश्‍वास असल्याने भाजपचा विजय निश्‍चीत आहे. राष्ट्रवादीने पुणे लोकसभा मतदारसंघावर दावा सांगितल्याने महाविकास आघाडीतील मतभेद समोर आले आहेत. त्यांच्या संघर्ष पेटला असून तो निवडणुकीतही कायम राहील, असेही मुळीक म्हणाले.

टॅग्स :BjppuneDrainage Cleaning