

Historical Connection: Celebrating 150 Years of Mahatma Phule's Membership in Pune Municipal Council
Sakal
पुणे : शहराची ओळख अधिक ठळक करण्यासाठी शहराच्या प्रवेशद्वारांवर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाने प्रवेशद्वार उभे करण्याचा निर्णय पुणे महापालिकेच्या स्थायी समितीने घेतला आहे.
शहरात प्रवेश करताना पुण्याची सांस्कृतिक, ऐतिहासिक आणि आधुनिक ओळख अधोरेखित होईल, अशा पद्धतीने ही प्रवेशद्वारे उभारली जाणार आहेत. त्यामुळे शहराच्या सौंदर्यात भर पडण्यासोबतच नागरिकांमध्ये अभिमानाची भावना वृद्धिंगत होईल. या निर्णयानुसार शहराच्या विविध प्रमुख सीमांवर टप्प्याटप्प्याने प्रवेशद्वार उभारले जाणार असून, पुण्याच्या नियोजनबद्ध विकासाला यामुळे चालना मिळणार आहे, असे अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांनी सांगितले.