पुणे : शहरात दुचाकीस्वार चोरट्यांकडून महिलांच्या सोनसाखळ्या चोरण्याचे सत्र सुरूच आहे. गुरुवारी सकाळी तासाभरात चोरट्यांनी दोन महिलांचे सोन्याचे मंगळसूत्र हिसकावून नेल्याच्या घटना घडल्या. .सोमवार पेठेतील एक महिला (वय ४०) सकाळी सात वाजण्याच्या सुमारास पायी निघाली होती. त्यावेळी दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी महिलेला अडविले. त्यानंतर जबरदस्तीने महिलेचे ६५ हजार रुपये किमतीचे सोन्याचे मंगळसूत्र हिसकावून चोरटे पसार झाले. याबाबत समर्थ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे..Land Deal Controversy : डॉ.बाबासाहेब आंबेडकर भवनाच्या विस्तारीकरणासाठीचा भुखंड तत्काळ द्यावा, अन्यथा अनुयायी रस्त्यावर उतरणार.वडगाव शेरीतील एक महिला (वय ४७) सकाळी आठ वाजता शुक्रवार पेठेतील जेधे महाविद्यालयाच्या परिसरातून पायी निघाली होती. त्यावेळी व्हाइट हाऊसजवळ दुचाकीवर आलेल्या चोरट्यांनी महिलेचे ४० हजार रुपये किमतीचे सोन्याचे मंगळसूत्र हिसकावून नेले. महिलेने आरडाओरडा केला. परंतु तोपर्यंत चोरटे दुचाकीवरून पसार झाले. याबाबत खडक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे..चोरट्यांनी पुन्हा डोके वर काढले शहर आणि उपनगरांमध्ये सोनसाखळी चोरट्यांनी पुन्हा डोके वर काढले आहे. पोलिस बीट मार्शल गस्तीवर असतात. तरीही दुचाकीस्वार चोरट्यांकडून पादचारी नागरिकांना धमकावून सोनसाखळी आणि मंगळसूत्र हिसकावण्याच्या घटना घडत आहेत. पीएमपी बसमध्ये गर्दीचा फायदा घेत सोनसाखळ्या, सोन्याच्या बांगड्या चोरण्याचे प्रकार सुरू आहेत. त्यामुळे महिलांमध्ये असुरक्षितेचे वातावरण निर्माण झाले आहे. याबाबत स्थानिक पोलिसांकडून सोनसाखळी चोरट्यांवर जरब बसविण्याची गरज निर्माण झाली आहे..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.