
पुणे : शहरातील पायाभूत सुविधांपासून शुद्ध पाणीपुरवठा करण्यापर्यंतच्या पुणेकरांच्या जिव्हाळ्याच्या आणि जुन्या प्रश्नांकडे दुर्लक्ष झाल्याचे नुकत्याच संपलेल्या पावसाळी अधिवेशनात दिसून आले. पुणे-मुंबई औद्योगिक कॉरिडॉर, बंद पडलेले सीसीटीव्ही कॅमेरे, स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांचे प्रश्न, नंबर प्लेट बसविण्यासाठी मुदतवाढ अशा शहराच्या नवीन प्रश्नांकडे सरकारचे लक्ष वेधण्यात आ मदारांचा भर राहिला.