Cricket Tournament : पुणे शहर पोलीस संघाचा उपांत्य फेरीत प्रवेश | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

pune

Cricket Tournament : पुणे शहर पोलीस संघाचा उपांत्य फेरीत प्रवेश

उंड्री : वडकी (ता. हवेली) येथे पुणे जिल्हा क्रिकेट असोसिएशन आयोजित सदू शिंदे साखळी स्पर्धेमध्ये उपउपांत्य फेरीत पुणे शहर पोलीस दलाने उपांत्य फेरीत प्रवेश केला. पुणे जिल्हा क्रिकेट असोसिएशन आणि आझम कॅम्पसमध्ये मॅच सुरू होती. त्यांनी पुणे पोलीस संघाला बाय दिल्याने पुणे शहर पोलीस संघाचा उपांत्य फेरीत प्रवेश झाला.

पोलिसांच्या मैत्रीपूर्ण क्रिकेट सामन्यात सीपी-11 संघाने बाजी मारली.

शहर पोलीस दलाच्या दोन संघांमध्ये मैत्रीपूर्ण सामना झाला. या सामन्यांमध्ये पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, पोलीस निरीक्षक उल्हास कदम सहाय्यक पोलीस निरीक्षक नंदकुमार कदम यांनी सहभाग घेऊन सामन्यात रंगत वाढवली. पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता हे 41 धावा काढून नाबाद राहिले. गुप्ता यांनी उल्हास कदम, पृथ्वी गायकवाड, नंदू कदम, विपून गायकवाड तसेच अश्र्वजित सोनवणे यांच्यासोबत भागीदारी करून धावफलक हलता ठेवला.