
पुणे शहरात अनेक ठिकाणी कचऱ्याचे ढीग लागत असल्याने महापालिका प्रशासनाने संबंधित कर्मचारी व अधिकाऱ्यांवर कारवाई सुरू केली आहे.
पुणे : कचरा न उचलल्याने तीन मुकादम निलंबीत
पुणे - शहरात अनेक ठिकाणी कचऱ्याचे ढीग लागत असल्याने महापालिका प्रशासनाने संबंधित कर्मचारी व अधिकाऱ्यांवर कारवाई सुरू केली आहे. स्वच्छतेच्या कामात हलगर्जीपणा केल्याने नगर रस्ता क्षेत्रीय कार्यालयाच्या तीन मुकादमांवर निलंबनाची कारवाई केली आहे. तर चौघांना प्रत्येकी १ हजार रुपयांचा दंड केला आहे. घनकचरा विभागाचे उपायुक्त अजित देशमुख यांनी ही कारवाई केली.
शहर स्वच्छता असले पाहिजे असे आयुक्तांचे आदेश आहे, त्यानुसार अजित देशमुख यांनी शहराच्या विविध भागात प्रत्यक्ष जागेवर जाऊन पाहणी केली. त्यामध्ये नगररस्ता क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत अस्वच्छता आढळून आल्याने मुकादम सुरेश कांबळे, आकाश नरसिंग, भालचंद्र ओव्हाळ या तिघांना निलंबित केले. तर आरोग्य निरीक्षक हनुमंत सावळी, घोले रस्ता क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीतील आरोग्य निरीक्षक कविता खरात-सिसोलेकर, सुदेश सारवान आणि विकास खुडे यांना प्रत्येकी १ हजारांचा दंड केला आहे, अशी माहिती देशमुख यांनी दिली.
Web Title: Pune City Three Cases Suspended Due To Non Collection Of Garbage
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..