
पुणे : पुणे शहरातील सांडपाणी वाहिन्या स्वच्छतेसाठी १३ गाड्या खरेदी करण्यासाठी तब्बल ९५ कोटी रुपये महापालिकेला राज्य शासनाला द्यावे लागणार होते. यामध्ये सांडपाणी वाहिन्यांची स्वच्छतेऐवजी महापालिकेची तिजोरीच रिकामी होईल अशी टीका करण्यात आली. त्यानंतर महापालिका प्रशासनाने सावध भूमिका घेतली आहे. महापालिका लगेच ९५ कोटी रुपये देणार नाही तर गाड्या आल्यानंतर टप्प्याटप्प्याने काम जसे पूर्ण होईल तसे पैसे दिले जातील असे पत्र महापालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांनी नगरपरिषद प्रशासन संचालनालयाला पाठवले आहे.