ncp and congress party
sakal
पुणे - दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येणार असल्याची अधिकृत घोषणा अद्याप झालेली नाही. मात्र शहर पातळीवर दोन्ही राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांच्यामध्ये बैठका सुरू झाल्या आहेत. काही अटींवर काँग्रेसने तयारी दर्शविली असून, पहिल्या टप्प्यात काँग्रेसने ६८ जागांचा, तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने ७६ जागांचा प्रस्ताव राष्ट्रवादी काँग्रेसला (अजित पवार) दिला आहे. त्यामुळे स्थानिक पातळीवर आघाडीत एकत्र येण्याबाबतच्या हालचालींना वेग आला आहे.