आता बास झाली कोर्ट कचेरी...आपल्यातच मिटवू; कोरोनामुळे बदलली दावेदरांची मानसिकता

civil-court-pune
civil-court-pune

पुणे - आपल्यातील वाद मिटविण्यात कोर्ट-कचेरीत एवढा वेळ व पैसा गेला. त्यात करोनामुळे आर्थिक कोंडी झाली आहे. नोकरी-धंद्यांत निश्‍चित उत्पन्न राहिले नाही. त्यामुळे आता आपल्यातच वाद मिटवू घेवून न्यायालयात चकरा मारायचे बंद करू, अशी मानसिकता आर्थिक विवंचनेत असलेल्या दिवाणी स्वरूपाच्या दावेदारांची झाली आहे. त्यामुळे आता या प्रकरणांत तडजोड करण्याबाबत पक्षकारांकडून चौकशी होऊ लागली आहे. 

दिवाणी स्वरूपाचा दावा निकाली निघण्यासाठी अनेक वर्षांचा कालावधी जात असतो. या सर्वात मानसिक त्रास होऊन पैसे देखील मोठ्या प्रमाणात खर्च होण्याची शक्यता असते. त्यात निकाल आपल्याच बाजूने लागेल याची शाश्वती नाही. मात्र तडजोड केली तर त्वरित निकाली लावून दोन्ही पक्षकारांचे समाधान होऊ शकते. कोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत हीच बाब पक्षकारांच्या लक्षात येत असून वाद नको संवाद करू या भावनेतून गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेले मालमत्तेचे प्रश्न सामंजस्याने मिटवण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. अशी काही प्रकरणे देखील पुढे आली आहेत. 

जमिनीसंदर्भातील 2014 पासून प्रलंबित असलेला एक दावा आहे. शेतकऱ्याने एका बिल्डरला जमिन विकसित करण्याबाबत नोटरी करार करून दिला. तर दुसऱ्या बिल्डरला रजिस्टर करारानुसार जमिन दिली. त्या बिल्डरने जमिनीवर कामही सुरू केले. त्यावेळी पहिल्या बिल्डरने आक्षेप घेतला. रजिस्टर करार रद्द करण्यासाठी आणि स्पेसिफिक परफॉमन्स आणि मनाई आदेशासाठी दावा दाखल करण्यात आला. सहा वर्षांपासून हा दावा प्रलंबित असल्याने जमिन विकसित करता येत नाही. विकसित केलेल्या संपत्तीला ग्राहक मिळेल का? लोकांकडूनही आता फ्लॅटसाठी फारशी चौकशी होत नाही. या सर्वाचा विचार करून दुसऱ्या बिल्डरने तडजोडीसाठी हात पुढे केला. त्यास पहिल्या बिल्डरने प्रतिसाद दिला आहे. जूनमध्ये दोघात समझोता होणार असून, याबबत न्यायालयात तसा अर्ज करण्यात येणार आहे. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

दुसरा वाद भाव-बहिण यांच्यातील आहे. त्यांचा दावा 2012 पासून प्रलंबित आहे. भावाने वडिलोपार्जित जमिन बिल्डरला विकसित करण्यासाठी दिली. तिथे बिल्डरने बांधकामही केले आहे. व्यवहाराच्या वेळी बहिणीचे हक्क सोडपत्र लिहून दिलय. मात्र, फसवणूक करून जमीन घेतल्याचे बहिण सांगत आहे. करोनाच्या पार्श्‍वभूमीवर बहिणीच्या मुलाची नोकरी गेली आहे. भविष्याचा विचार करता बहिणीने तडजोडीसाठी पुढाकार घेतला. ठरल्याप्रमाणे फ्लॅट आणि काही रक्कम अथवा दोन फ्लॅटवर तडजोड करण्यास ती तयार आहे. 

याबाबत ऍड. नितीन झंझाड सांगतात की, वकील न्यायालयात पक्षकारांना न्याय मिळवून देण्यासाठी दावा दाखल करतो. तो वाद तडजोडीअंती मिटत असेल तर भविष्यासाठी चांगलेच आहे. बऱ्याच प्रकरणात पिढ्यानपिढा सुनावणी सुरू असते. त्यामध्ये वेळ, पैसा खर्ची होतो. असा वाद घालण्यापेक्षा समझोता होऊन प्रकरण मिटलेले चांगलेच. करोना संसर्गामुळे नगरिकांना भविष्याची चिंता वाटत आहे. त्यामुळे काही पक्षकारांची दाव्यात तडजोड करण्यासाठीची मानसिकता वाढली आहे. 

पिंपरी चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

ज्यांची आर्थिक विवंचना झालेली आहे ते तडजोड करू शकता. मात्र ज्यांनी ठरवून दावा दाखल केला आहे ते तडजोड करतील याची शक्यता कमी आहे. लॉकडाउन काळात बंद आलेल्या दिवाण न्यायालयाला तशीही उन्हाळ्यात सुटी आहे. त्यामुळे दावेदारांना देखील माहीत असते की सूनवणी पुढे जाणार. याबाबतचे नेमके चित्र ऑगस्टमध्ये स्पष्ट होईल. पण जर तडजोड करून घरातील वाद मिटत असतील तर चांगलेच आहे.  
 प्रशांत माने, वरिष्ठ वकील.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com