व्यवसाय अभ्यासक्रमाचे भविष्य अधांतरी

व्यवसाय अभ्यासक्रमाचे भविष्य अधांतरी

पुणे - एकीकडे नव्याने येऊ घातलेल्या राष्ट्रीय शिक्षण धोरणात कौशल्यावर आधारित आणि रोजगाराभिमुख अभ्यासक्रमावर भर देण्यात आला आहे, तर दुसरीकडे राज्य सरकार रूपांतरणाच्या निमित्ताने  कौशल्यावर आधारित असणारा उच्च माध्यमिक व्यवसाय अभ्यासक्रम (व्होकेशनल) बंद करण्याचा घाट घालत आहेत. परिणामी या अभ्यासक्रमात शिक्षण घेणारे आणि नव्याने शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्‍यात येण्याची शक्‍यता आहे.

राज्यातील जवळपास एक लाख २० हजार विद्यार्थी सध्या उच्च माध्यमिक व्यवसाय अभ्यासक्रमात पदवीपूर्व शिक्षण घेत आहेत. तर आताही अकरावी प्रवेशातही विद्यार्थी व्होकेशनलला प्रवेश घेत आहेत. मात्र, या अभ्यासक्रमाच्या रूपांतरणाचा घाट राज्य सरकार घालतल्याने विविध संघटना त्याला विरोध करत आहेत. अभ्यासक्रमासाठी नेमलेल्या रूपांतरण समितीची बैठक नुकतीच झाली. त्यातही अभ्यासक्रमाच्या सक्षमीकरणाचा मुद्दा सदस्यांनी मांडला. आता सर्वांचे लक्ष समितीच्या अहवालाकडे लागले आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

व्यवसाय अभ्यासक्रमात काळानुरूप बदल करणे आवश्‍यक आहे, त्यासाठी सरकारने ठोस पावले उचलणे अपेक्षित आहे. कोणत्याही परिस्थितीत विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये, म्हणून हा अभ्यासक्रम सरकारला बंद करू देणार नाही.
- विक्रम काळे, शिक्षक आमदार आणि अध्यक्ष, उच्च माध्यमिक व्यवसाय अभ्यासक्रम रूपांतरण समिती

महाराष्ट्रातील बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

व्होकेशनल टीचर्स असोसिएशनचे अध्यक्ष जयंत भाभे यांचे म्हणणे 
रूपांतरण कसे करणार याचे कोणतीही रोल मॉडेल सरकारकडे नाही.
प्रत्येक व्यवसाय अभ्यासक्रमासाठी सुरुवातीला केवळ ७५ हजार रुपये अनुदान दिले गेले. 
त्यानंतर अभ्यासक्रमात दोनदा बदल झाला, मात्र यंत्रसामग्री, उपकरणासाठी कोणतेही अनुदान देण्यात आले नाही.
अभ्यासक्रम सुरू केल्यापासून ३२ वर्षांत शासकीय आणि खासगी आस्थापनांनी त्यांच्या सेवाप्रवेश नियमावलीत अभ्यासक्रमांचा समावेश केलेला नाही.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com