

pune crime news
esakal
पुणे : पुण्यातील मार्केट यार्ड परिसरातील एका खाजगी कोचिंग क्लासमध्ये आठवीत शिकणाऱ्या एका निष्पाप विद्यार्थ्यावर लैंगिक अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. क्लासमधील ऑफिस बॉयने विद्यार्थ्याला स्टोअर रूममध्ये घेऊन त्याच्यावर अनैतिक कृत्य केले आणि त्याच्या खासगी अवयवांचे फोटोही काढले. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला तत्काळ अटक केली असून, पॉक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.