
पुणे - पुणेकर थंडीने चांगलेच गारठले आहेत. पुण्यात ६.५ अंश सेल्सिअस अशा सर्वांत कमी थंडीची नोंद राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी (एनडीए) भागात झाली. शिवाजीनगर परिसरात थंडीचा पारा ८ अंश सेल्सिअसवर होता, तर पुढील चोवीस तास थंडीचा कडाका कायम राहणार असल्याचा अंदाज वेधशाळेकडून वर्तविण्यात आला आहे.